सिन्नरच्या कला केंद्रावर छमछम! अंधाराचा फायदा घेत नृत्यांगना पसार; पोलिसांची धाड  

सिन्नर (जि.नाशिक) : गुरेवाडी शिवारातील कला केंद्रावर रात्रीच्या वेळी राजरोस नृत्यांगनांचे नाचगाणे सुरू होते. गेले वर्षभर तेथे हा प्रकार सुरू असला तरी अद्याप पर्यंत प्रशासकीय यंत्रणांकडून मात्र दुर्लक्ष करण्यात येत होते. अर्थात पोलिस प्रशासनाच्या मेहेरबानीने हा प्रकार सुरू असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. काय घडले नेमके?

सिन्नरच्या पायल कला केंद्रावर छमछम!

नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर नजीकच्या गुरेवाडी फाटा येथे असलेल्या बहुचर्चित पायल कला केंद्रावर गुरुवारी (ता.1) रात्री दहा वाजेच्या सुमारास  कला केंद्रातील एका खोलीत बंद दरवाजा आड डीजेच्या आवाजात नाचगाणे सुरू होते. मात्र, पोलिसांची कुणकुण लागल्यावर नृत्यांगनांनी खोलीतून बाहेर पळ काढला व अंधाराचा फायदा घेत बाजूच्या शेतात पळून गेल्या. या कारवाईत कला केंद्राचा व्यवस्थापक विशाल धोंडीराम मुसळे (44) रा. सोलापूर, भानुदास विश्वनाथ घुगे (36), समीर आरिफ शेख (30) दोघे राहणार पास्ते, मंगेश सुदाम भाबड (21) रा. नांदूर शिंगोटे व स्वप्नील कालिदास पाटील (24) रा. नाशिक वेस, सिन्नर या चौघा ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शासनाच्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे उल्लंघन करून बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी पोलीस शिपाई धनाजी जाधव यांच्या फिर्यादीवरून वरील पाच जणांविरुद्ध सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राष्ट्रीय व्यवस्थापन कायदा 2005 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

पोलिस प्रशासनाच्या मेहेरबानीने हा प्रकार सुरू?

जिल्हाधिकाऱ्यांच्या कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाची पायमल्ली करून गुरेवाडी शिवारातील कला केंद्रावर रात्रीच्या वेळी राजरोस नृत्यांगनांचे नाचगाणे सुरू होते. गेले वर्षभर तेथे हा प्रकार सुरू असला तरी अद्याप पर्यंत प्रशासकीय यंत्रणांकडून मात्र दुर्लक्ष करण्यात येत होते. अर्थात पोलिस प्रशासनाच्या मेहेरबानीने हा प्रकार सुरू असल्याचे उघडपणे बोलले जात आहे.

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

अंधाराचा फायदा घेऊन नृत्यांगना पसार ; पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर नजीकच्या गुरेवाडी फाटा येथे असलेल्या बहुचर्चित पायल कला केंद्रावर गुरुवारी दि.1 रात्री दहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांचा छापा पडत असताना नृत्यांगना पसार झाल्याचे सांगत या कारवाईत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिली.एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने छाप्याची कारवाई केली. 