सिन्नरला रिक्षा चालकास जबर मारहाण; खिशातील रक्कम व रिक्षा लांबवली 

सिन्नर (जि.नाशिक) :  माळेगाव एमआयडीसी परिसरात एल अँड टी फाट्यानजीक नाशिक-सिन्नर महामार्गावर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी रिक्षा चालकास जबर मारहाण करून त्याच्या खिशातील रोख रक्कम व रिक्षा लांबवल्याची घटना आज (ता.3) सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.

नाशिक रोडच्या रिक्षा चालकास जबर मारहाण
नासिर युनूस खान (रा. देवळाली गाव) राजवाडा, नाशिक रोड असे या घटनेत जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानक येथील सातपीर बाबा रिक्षा स्टॅन्ड वरून रिक्षा क्रमांक एम एच 15 एफ यु 0424 या पहाटे सहा वाजेच्या सुमारास माळेगाव एमआयडीसी सिन्नर येथे प्रवासी भाडे घेऊन खान निघाले होते. सकाळी सात वाजेच्या सुमारास एल अँड टी फाट्यानजीक आल्यावर पाठीमागून पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडवले. हातातील हत्याराने रिक्षाची काच फोडून त्यांनी खान यांना बाहेर ओढले. त्यांना रस्त्यावरच मारहाण करायला सुरुवात केली व अंगावरील जॅकेट काढून घेतले.

सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल

शर्टच्या खिशात असलेली 1800 ते 2000 रुपये दरम्यानची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. दरम्यान हा प्रकार सुरू असताना रिक्षा मधील तिघा प्रवाशांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना मध्ये न पडण्याची धमकी या हल्लेखोरांनी दिली. नंतर खान व इतर प्रवाशांना तेथेच सोडून रिक्षा घेऊन तिघांनीही पलायन केले. हा प्रकार खान यांनी रिक्षा मालक रशीद पठाण व नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील अन्य रिक्षाचालकांना कळवला. त्यानंतर पठाण व रेल्वे स्टेशन परिसरातील अनेक रिक्षाचालक लगोलग घटनास्थळी पोहोचले. या घटनेत जखमी झालेल्या रिक्षाचालक खान यांना उपचारासाठी सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

उशीरापर्यंत तक्रार नोंदवून घेतलीच नाही
रिक्षा मालक व अन्य रिक्षाचालक एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता तेथे दहा वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नसल्याचा प्रकार घडला. ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कर्मचार्‍याने साहेब येईपर्यंत थांबा असे या रिक्षाचालकांना सांगितल्याची चर्चा आहे. त्यानंतर दहा वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे पोलिस ठाण्यात चौधरी यांनी उपजिल्हा रुग्णालयात येऊन जखमी झालेल्या रिक्षाचालकाची विचारपूस केली व त्याचा जबाब नोंदविण्यास सांगितले.

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी