सिन्नर (नाशिक) : २०२१ ते २०२५ दरम्यान निवडणुका होणाऱ्या तालुक्यातील सर्व ११४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत १४ डिसेंबरला तहसील कार्यालयात सकाळी दहाला काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली.
तालुक्यातील सुमारे १०० ग्रामपंचायतींची मुदत गेल्या मार्च ते ऑगस्टदरम्यान संपली असून, कोरोनामुळे निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. या निवडणुका आता नवीन वर्षात घेण्याचे नियोजन आहे. तालुक्यात असणाऱ्या सर्व ११४ ग्रामपंचायतींच्या २०२१ ते २०२५ या कालावधीत पंचवार्षिक निवडणुका होणार आहेत. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी कोणत्या प्रवर्गातील व्यक्ती विराजमान होणार याची निश्चिती सोडतीद्वारे निश्चित करण्यात येणार आहे. कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या निवडणुकांना नव्या वर्षात मुहूर्त लागणार असल्याने गावोगावीचे इच्छुक देव पाण्यात बुडवून बसले आहेत. मातब्बरांसोबतच अनेकांच्या नजरा सरपंच आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत.
हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO
असे असेल आरक्षण
११४ ग्रामपंचायतींसाठी सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात येईल. अनुसूचित जाती ७, अनुसूचित जमाती १४, इतर मागास प्रवर्ग ३०, तर सर्वसाधारण ६३ याप्रमाणे सरपंचपद आरक्षण असेल.
हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न