सिन्नर : पुढारी वृत्तसेवा- येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर शिवशाही बसच्या चाकाखाली चिरडून तरुण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.15) सकाळी ७.४५ च्या सुमारास घडली. विजय नामदेव मोरे (४२, रा. सातपीरगल्ली, सिन्नर) असे मृताचे नाव आहे.
पालघर डेपोची शिर्डी-पालघर ही शिवशाही बस (एमएच. ०९-सीएम.९५८७) शुक्रवारी सकाळी शिर्डीहून आल्यानंतर बसस्थानकात जात असताना ही घटना घडली. विजय मोरे हा बसस्थानकातून पायी बाहेर पडत होता. त्याचवेळी बसच्या पुढच्या मागील चाकाखाली तो सापडला. चालक जगदीश पिताबर पाटील (३८, रा. पालघर) यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ बस थांबविली. मात्र डोक्यावरुन चाक गेल्याने तरुणाचा मृत्यू झाला. बराच वेळ मृताची ओळख पटत नव्हती. सिन्नर पोलिस ठाण्यात कार्यवाही सुरु आहे.
हेही वाचा :
- EV Sales : ‘ईव्ही’ विक्रीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी, वर्षभरातच विजेच्या मागणीत तीनपट वाढ
- विद्युतपुरवठा, ना सुरक्षारक्षक! वाघोलीतील स्मशानभूमीची दुरवस्था
- लुटारू गुंड आदर्श चौधरी टोळीवर मोक्का
The post सिन्नर बस स्टॉपवर शिवशाही'च्या चाकाखाली चिरडून तरुण ठार appeared first on पुढारी.