सुटीच्या दिवशी मुद्रांक कार्यालये राहणार सुरू 

नाशिक : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुद्रांक व नोंदणी कार्यालये शनिवारी सुटीच्या दिवशी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी सुटीच्या दिवशी नाशिकसह मालेगाव, निफाड, येवला, नांदगाव, सिन्नर, बागलाण, दिंडोरी व इगतपुरी येथील कार्यालये २० व २७ मार्चला सुरू राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा सहनिबंधक वर्ग-१ कैलास दवंगे यांनी दिली.

सुटीच्या दिवशी मुद्रांक कार्यालये राहणार सुरू 

मार्च महिन्यात मुद्रांक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट असते; परंतु यंदा कोरोनामुळे वसुलीवर परिणाम झाला आहे. त्यात कोरोना संसर्गाचा वेग अधिक वाढल्याने सेमी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्याचा परिणाम वसुलीवर होत आहे. शनिवार व रविवार दोन दिवस सुटी असल्याने सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात कार्यालयांमध्ये गर्दी होते. त्यातून कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सुटीच्या दिवशी शनिवारीदेखील कार्यालये सुरू ठेवली जाणार आहेत. 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा