सुधीर मुनगंटीवार : राजकीय शुक्राचार्यांपासून सावध राहा

सुधीर मुनगंटीवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जनतेला विविध विषयांवर भ्रमित करणारे राजकीय शुक्राचार्य मोठ्या संख्येने भोवती पसरले आहेत. त्यांच्यापासून जनतेने सावध राहावे, असे आवाहन भाजप प्रदेश कार्यकारिणीत मांडलेल्या राजकीय प्रस्तावात करण्यात आले. तसेच या राजकीय शुक्राचार्यांपासून जनतेला वाचविण्यासाठी कंबर कसून सिद्ध होण्याचा संकल्पही राजकीय प्रस्तावाद्वारे करण्यात आला.

राज्याचे सांस्कृतिक कार्य, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेला हा राजकीय प्रस्ताव एकमताने पारित करण्यात आला. प्रस्तावाला आमदार आशिष शेलार, खासदार प्रीतम मुंडे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनुमोदन दिले. प्रस्ताव मांडताना मुनगंटीवार यांनी विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली. सत्ता गेल्यावर विरोधक प्रत्येक भाषणात फक्त माझी सत्ता, माझी खुर्ची आणि माझा परिवार याच्या पलीकडे काही बोलू शकत नाहीत. जनतेचे प्रश्नही मांडत नाहीत. मात्र, विविध विषयांत जनतेच्या मनात भ्रम निर्माण करत राहतात. गेल्या अडीच वर्षांत मोदी सरकारने जनतेला केलेली मदत आणि राज्यातील जनतेशी द्रोह करून बनविलेल्या विरोधकांच्या सरकारने केलेली अडवणूक यांची तुलना जनता करत आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आपले सरकार आल्यावर शेतकरी, महिला, मागासवर्गीय अशा विविध घटकांना न्याय देत मदत करत आहे.

हेही वाचा:

The post सुधीर मुनगंटीवार : राजकीय शुक्राचार्यांपासून सावध राहा appeared first on पुढारी.