सुरगाणा नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना धक्काबुक्की; युवकांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : (सुरगाणा) नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले यांना धक्काबुक्की करून त्यांना ठार करण्याची धमकी दिल्याने सुरगाणा पोलिस ठाण्यात दोघा तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

असा आहे प्रकार

गुरुवारी (ता. २६) नगरपंचायतीचे कामकाज सुरु असतांना एक वाजेच्या सुमारास दोन युवक रुपेश राजेंद्र कानडे व पुष्पक राजेंद्र कानडे यांनी येथील मुख्याधिकारी हे कार्यालयात शासकीय कर्तव्य पार पाडत असतांना काही कारणावरून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. मुख्याधिकारी नागेश येवले यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी देऊन शासकीय काम करण्यास रोखले. तसेच येवले यांची खासगी कार (एम.एच 12,एन.पी- 5369) या गाडीच्या बोनटवर तसेच दरवाजावर लाथा बुक्क्यांनी प्रहार केले आहे.

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

याप्रकरणी मुख्याधिकारी नागेश येवले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या संबंधित दोघा भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे व ठाणे अंमलदार सदाशिव गांगुर्डे हे पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार