सुलभ शौचालयात तरुणाचे भयानक कृत्य; नागरिकांनाही धक्का, सहा दिवसांत दुसरी घटना 

नाशिक : वेळ सकाळी साडेआठची..सुलभ शौचालयात नागरिकांनी अचानक एक दृश्य पाहिले. ज्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली..काय घडले नेमके?

शौचालयातील दृश्य पाहून नागरिकांना फुटला घाम

पंचशीलनगरमधील सुलभ शौचालयात गंगाराम जाधव यांनी सकाळी साडेआठच्या सुमारास गळफास घेतल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. सुलभ शौचालयात गळफास घेऊन एकाने रविवारी (ता. ७) आत्महत्या केली. गंगाराम अर्जुन जाधव (वय ३५, रा. पंचशीलनगर, गंजमाळ) असे मृताचे नाव आहे. ओळख पटविल्यानंतर त्यांची चुलत बहीण कुसुम जाधव यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन त्यांचा चुलत भाऊ असल्याची खात्री केली. माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. तसेच नातेवाईक व नागरिकांकडून घटनेची माहिती घेतली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याबाबत भद्रकाली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. हवालदार आर. एम. वाघ तपास करीत आहेत. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

सहा दिवसांत दुसरी घटना 
गंजमाळ भागात गळफास घेऊन आत्महत्या करण्याची सहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. मंगळवारी (ता. २) गंजमाळ भीमवाडी घरकुल इमारतीत पहिली घटना घडली. त्यात योगेश हिवाळे याने गळफास घेऊन जीवन संपविले होते, तर रविवारी (ता. ७) गंगाराम जाधव यांनी पंचशीलनगर भागातील सुलभ शौचालयात गळफास घेतला.  

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा