सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, डॉक्टरांची टीम हॉटेलवर दाखल

सुषमा अंधारे

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांची शुगर लेव्हल कमी झाल्याने त्या अस्वस्थ आहेत. त्यांचा रक्तदाब देखील कमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती समोर आल्यानंतर डॉक्टरांचे पथक त्या थांबलेल्या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.

सुषमा अंधारे यांच्या भाषणासाठी परवानगी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी ऑनलाईन सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. पण त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी मुक्ताईनगर येथील सभेसाठी परवानगी नाकारल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत. अखेर तणाव वाढत असल्याने सुषमा अंधारे यांनी मधला मार्ग काढत ऑनलाईन सभा घेण्याचे ठरवले होते. मात्र आता त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली. त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांची शुगर लेव्हल कमी झाली. त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आल्यानंतर डॉक्टरांची टीम हॉटेलवर दाखल झाली.

हेही वाचलंत का?

The post सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, डॉक्टरांची टीम हॉटेलवर दाखल appeared first on पुढारी.