नाशिक : (जेलरोड) सायंकाळची वेळ...दिवसभर ते बांधकाम सुरु असलेल्या साईडवर होते. सेंट्रिंगचा लाफा घेण्यासाठी ते तिसऱ्या मजल्यावर गेले. अन् काळाने गाठले. काही मिनिटांतच सारं काही संपलं. वाचा नेमके काय घडले?
अशी आहे घटना
मंगळवारी (ता. १) सायंकाळी सेंट्रिंगचे काम करताना तिसऱ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाला. राजू पटेल (पूर्ण नाव, पत्ता नाही) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी संतोष देवराम आंधळे (रा. मोरवाडी) यांच्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शिवरामनगर येथील साइटवर बिल्डिंगचे काम सुरू होते. त्या वेळी राजू पटेल हा सेंट्रिंगचा लाफा घेण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर गेला असता, पाय घसरल्याने लिफ्टच्या मोकळ्या जागेतून तो खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
ठेकेदारावर गुन्हा दाखल
सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना न केल्याने उपनगर पोलिस ठाण्यात ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची