सेल्फी पॉईंटच्या दरीत दुर्गंधी येताच युवकांनी डोकावले; त्याचक्षणी बसला धक्का

वणी (जि.नाशिक) :  नांदुरी - सप्तशृंगी गड या १० किमी घाट रस्त्यावरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सेल्फी पॉईंटच्या दरीत दुर्गंधी येत असल्याने स्थानिक युवकांनी दरीत डोकावून पाहिले आणि त्याचक्षणी त्यांना धक्काच बसला. नेमके काय घडले?

तीनशे फुट दरीत काय आढळले?

नांदुरी - सप्तशृंगी गड या १० किमी घाट रस्त्यावरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सेल्फी पॉईंटच्या दरीत दुर्गंधी येत असल्याने स्थानिक युवकांनी दरीत डोकावून पाहिले असतात त्यांना असलेला झुडपात तरुणाचा मृतदेह अडकल्याचे दिसले. याबाबतची माहीती कळवण पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी पोलिस मित्र व स्थानिक तरुणांच्या मदतीने दोरखंड दरीत सोडून दोरखंडाद्वारे दरीत उतरुन मृतदेह काढण्यात आला. यावेळी  पोलीस प्रशासन व पोलीस मित्रांना जीव धोक्यात घालून मोठी कसरत करावी लागली. तसेच युवकाचे मृतदेह पाच ते सहा दिवसांचा व कुजलेल्या अवस्थेत चेहरा छिन्नविछन्न असल्यामुळे ओळख पटणे पोलीस प्रशाशनाला अवघड जात आहे.

हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO

नक्की हत्त्या की आत्महत्या? 

नांदुरी - सप्तशृंगी गड घाटात मध्यावर सेल्फी पाईंट येथील सुमारे तीनशे फुट असलेल्या दरीत अज्ञात तरुणाचे मृतदेह आढळून आला आहे.नक्की हत्त्या की आत्महत्या याची चौकशी पोलीस करत आहेत.नक्की हत्त्या की आत्महत्या याची चौकशी पोलीस उपवीभागीय अधीक्षक अमोल गायकवाड यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नांदुरी पोलीस कर्मचारी एस. आय. खाडे, पोलीस नाईक योगेश गवळी, पोलीस कर्मचारी शिवा शिंदे, पोलीस कर्मचारी कोशिरे करत आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भूषण देशमुख, पोलीस मित्र चंद्रकांत पांनपाटील तसेच सप्तशृंगी गड ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी यांनीही मृतदेह काढण्यासाठी परिश्रम घेतले.

 हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न