सोने खरेदी करायचंय पण लॉकडाऊनमुळे गैरसोय? सराफ असोसिएशनतर्फे ‘हा’ निर्णय

नाशिक : शहरात वाढणाऱ्या कोरोना रूग्णसंख्येला आळा घालण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने नव्याने लावण्यात आलेल्या कोविड नियमावलीला दि नाशिक सराफ असोसिएशनने संपूर्णतः प्रतिसाद देण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून सराफ असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर....

 सराफ असोसिएशनचा निर्णय

जिल्‍हा प्रशासनाने जारी केलेल्‍या सूचनेनुसार सोमवार ते शुक्रवारदरम्‍यान जिल्‍हाभरातील दुकाने, बाजारपेठा, तसेच धार्मिक स्‍थळे सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत सुरू राहतील, तर शनिवार व रविवारी दुकाने, बाजारपेठा धार्मिक स्‍थळे पूर्णपणे बंद राहणार आहेत. मात्र या कालावधीत सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंगळवारची साप्ताहिक सुट्टी रद्द करून सोमवार ते शुक्रवार असे सलग पाच दिवस सराफ बाजारात व्यवहार सुरू असतील.

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

शनिवार व रविवार बंद

सराफ असोसिएशनच्या या निर्णयामुळे सोमवार ते शुक्रवार सलग पाच दिवस प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळेत शहरातील सराफ बाजार सुरू राहणार आहे . नव्या नियमावलीत शनिवार व रविवार दिवसभर व्यावसायीक आस्थापने बंद ठेवण्याचा नियम स्थानिक प्रशासनाने दिला आहे.

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO

असे असतील निर्बंध... 
जिल्ह्यातील सर्व आठवडेबाजार राहणार बंद 
-१५ मार्चपासून लॉन्‍स, मंगल कार्यालय, हॉलमधील. 
-लग्नसमारंभ व अन्‍य कार्यक्रम पूर्णपणे बंद राहतील. 
-खाद्यगृहे, परमिट रूम, बार ५० टक्‍के क्षमतेने. 
-सकाळी सात ते रात्री नऊदरम्‍यान सुरू राहतील. 
-होम डिलिव्‍हरीचे किचन, वितरण कक्ष रात्री दहापर्यंत सुरू राहील. 
-सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम पूर्णपणे बंद राहतील. 
-भाजी मंडई ५० टक्‍के क्षमतेने सुरू राहणार.