सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री पाहिजे का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जळगाव, पुढारी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील शासकीय विश्रामगृह नविन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री यांच्याहस्ते पार पडला. यानंतर त्यांनी मुक्ताईनगर येथे जाहीर सभा घेऊन उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार केला.

गुलाबराव पाटील यांना दरवेळी पानटपरीवाला म्हणून हिणवण्यात येते. कुणाला हिणवणे चुकीचे आहे. कुणीही शून्यातून येऊन नवनिर्मिती करत असतो. मी शेतकऱ्याचा मुलगा, आज मुख्यमंत्री झाला, पण हे विरोधकांना पचत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यानीच मुख्यमंत्री व्हायच काय, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर निशाना साधला.

यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेत असताना आम्ही उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी पक्ष संपवीत आहे, हे वारंवार सांगत होतो. त्यावेळी गुलाबराव पाटील देखील म्हणत होते, त्यांना सांगा राष्ट्रवादी आपल्याला संपवीत आहे. मी स्वतः त्यांना पाच वेळा सांगितले, कि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेलो ती चूक सुधारवा पण ऐकले नाही.

आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि मोदीचा फोटो लावला आणि निवडणूक जिंकलो. शिवसेनेतून बाहेर पडत आम्ही बरोबर केले. मात्र झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे जागे करणार? आम्ही चूक सुधरवली मग गद्दार कोण? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला. आमदार खासदार यांची काम होत नव्हती, आता ती दोन महिन्यात केली. विरोधी पक्ष आता घाबरला असून एकनाथ शिंदे गणपती मंडळ फिरतो, घराघरात जातो. त्यामुळे ते फिरत आहेत. आता त्यांनी अर्धे पुण्य मला द्यायला हवे. तर काहीजण दोन मुख्यमंत्री ठेवण्याचे सांगतात. मात्र त्यांना आधीचा अनुभव असल्याने ते असे म्हणत असल्याचा खोचक टोलाही मुख्यमंत्री शिंदेंनी अजित पवार यांना लगावला.

अडीच वर्षात शिवसेना शिल्लक राहणार नाही…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आजची गर्दी पाहून वाटले कि आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता. कालचे निकाल पाहून कळले कि फक्त अडीच महिन्यात आम्हाला कामाची पोचपावती मिळाली. आम्ही कुठेही काही लक्ष देखील दिले नाही तरी आम्हाला यश मिळाले. तुमच्या सर्वांमुळे हे यश मिळाले. ये तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है. पुढच्या अडीच वर्षात हाताच्या बोटावर मोजायला देखील शिवसेना शिल्लक राहणार नाही.

हेही वाचा

भिगवण : जबरी चोरी करणारे दोघे जेरबंद  

शेतमालाच्या दराची लपवाछपवी, संकेतस्थळावर आवक, दर प्रसिद्ध करण्याकडे बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष 

खारावडे : आंदगाव ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय

The post सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री पाहिजे का? appeared first on पुढारी.