सोन्याचे बिस्किट हाती लागले पण श्रीमंत होण्याचे स्पप्न भंगले!

नाशिक : घराच्या किचनमध्ये त्याला सोन्याचे बिस्कीट हाती लागले. आणि झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तो स्वप्न रंगवू लागला. पण त्या स्वप्नाचा आनंद जास्त काळ टिकला नाही. काय घडले वाचा...

झटपट श्रीमंत होण्याचे स्पप्न भंगले...

घराच्या किचनमध्ये प्रवेश करत संशयिताने १०० ग्रॅमचे बिस्कीट चोरी केल्याचा गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. निवृत्ती भीमराव बुरंगे (वय ३०, रा. हनुमानवाडी रोड) असे संशयिताचे नाव असून, तो मखमलाबाद रोडवरील मोरे मळा भागात येत असल्याची माहिती पथकातील पोलिस नाईक विशाल काठे यांना मिळाली. संशयिताने त्याचा मित्र दत्तू सुभाष गोसावी याच्या मदतीने सराफ बाजारात नंदकुमार दंडगव्हाळ यास बिस्कीट त्याचे स्वतःचे असल्याचे सांगून विक्री केली. पोलीसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आदींनी मोरे मळा येथे सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळ काढला. पण काही अंतरावर त्यास ताब्यात घेतले.

हेही वाचा>> निशब्द! अकरा दिवसांच्या बाळाला उराशी धरून सैनिकपत्नीने फोडला हंबरडा; आक्रोश आणि हळहळ

बिस्कीट त्याचे स्वतःचे असल्याचे सांगून विक्री

संशयिताने त्याचा मित्र दत्तू सुभाष गोसावी याच्या मदतीने सराफ बाजारात नंदकुमार दंडगव्हाळ यास बिस्कीट त्याचे स्वतःचे असल्याचे सांगून विक्री केले. गुन्हे शाखेने दंडगव्हाळ यांना विकलेले चोरीचे बिस्कीट जप्त केले. पुढील कारवाईसाठी संशयितास बिस्किटासह गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवृत्ती सरोदे, पोलिस हवालदार रवींद्र बागूल, दिलीप मोंढे, फय्याज सय्यद आदींनी मोरे मळा येथे सापळा लावला. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पाच लाखांच्या सोन्याच्या बिस्किटासह एकास ताब्यात घेतले.

हेही वाचा>> मध्यरात्रीचा थरार! पेट्रोलपंपावरून पाच लाख लांबविले; घटना cctv मध्ये कैद