सोन्याच्या बिस्किटावरून आजीबाईंना घातला गंडा; अडीच तोळ्याची सोन्याची पोत लंपास

नाशिक : आजी तुमचे सोन्याचे बिस्कीट पडले आहे,’ असे सांगत आजीबाईंना भामट्यांनी चांगलाच गंडा घातला. काय घडले नेमके?

‘आजी तुमचे सोन्याचे बिस्कीट पडले आहे,...

जुन्या सीबीएस स्थानकात सिडकोतील महिलेला सोन्याचे बिस्कीट पडल्याचे खोटे सांगून महिलेची अडीच तोळ्याची सोन्याची पोत लांबविली. याप्रकरणी जयवंताबाई लहामगे (वय ५५, उत्तमनगर, सिडको) यांच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शनिवारी (ता. २०) दुपारी अडीचच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी, ‘आजी तुमचे सोन्याचे बिस्कीट पडले आहे,’ असे जयवंताबाई लहामगे यांना सांगितले. मात्र, ‘बिस्कीट माझे नाही’, असे सांगितले. मात्र, दोन्ही भामट्यांनी, ‘तुमच्याच पिशवीतून पडले. आम्ही तुमचे नुकसान होण्यापासून वाचवत आहोत. आम्हाला काहीतरी बक्षीस द्या,’ असे म्हणत त्यांची अडीच तोळ्याची सोन्याची पोत लंपास केली. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

मामाला घाबरविण्यासाठी भाच्याचा गोळीबार 
नाशिक - वडनेर दुमाला शिवारातील पोरजे फार्महाउस परिसरात एकाने किरकोळ वादात गोळीबार केला. याप्रकरणी भास्कर पोरजे (५२, वडनेर दुमाला, गोविंदनगर) यांच्या तक्रारीवरून उपनगर पोलिस ठाण्‍यात गुन्हा दाखल झाला. भास्कर पोरजे यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी (ता. २०) साडेनऊच्या सुमारास त्यांचा भाचा संशयित संतोष निसाळ त्यांच्या घराजवळ आला. दमदाटी व शिवीगाळ करून त्यांच्याकडील पिस्तूलमधून एक राउंड हवेत फायर केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित संतोष निसाळ (३५, शिंगवे बहुला, देवळाली कॅप्प) याला अटक केली. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ