स्थायी समितीचा करवाढीला नकार; सभापती गितेंच्या थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीच्या सुचना 

नाशिक : महापालिका प्रशासनाने आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करताना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करांमध्ये कुठलीही वाढ न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्थायी समितीकडूनही करवाढीला नकार देण्यात आला. तर, थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करण्याच्या सूचना स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी दिल्या आहेत. 

महत्वाच्या कामांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

महापालिका प्रशासनाकडून आज (ता.१७) २३६२ कोटी रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक महासभेला सादर केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घरपट्टी, पाणीपट्टी मध्ये कुठलीही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला. अंदाजपत्रकाला स्थायी समितीने दुरुस्तीसह मंजुरी दिली. प्रशासनाने करवाढ न केल्याने स्थायी समितीकडूनही कुठलीच करवाढ होणार नसल्याचे सभापती गिते यांनी स्पष्टीकरण दिले. आता स्थायी समितीकडून महासभेला अंदाजपत्रक सादर केले जाईल. महापालिका निवडणुका लक्षात घेता महासभेकडूनही करवाढ होणार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान सभापती गिते यांनी थकबाकीसह घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करण्याच्या सूचना दिल्या. नगरसेवकांसाठी आयुक्तांकडून निधीची तरतूद केल्याचे स्वागत करताना नगरसेवकांनी महत्वाच्या कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, स्थायी समिती सदस्य सुधाकर बडगुजर यांनी त्रिमूर्ती चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलामुळे बाधित होणाऱ्या कुटूंबांना शासन योजनेचा लाभ देण्याची मागणी केली. प्रशासनाच्या अंदाजपत्रकातील भांडवली व महसुली खर्चाबाबत अधिकारीचं अनभिज्ञ असल्याचे श्री. बडगुजर यांच्या आकडेमोडीवरून स्पष्ट झाले. 

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्थायी समितीकडून कुठलीही करवाढ होणार नाही. मात्र, प्रशासनाने थकबाकीसह घरपट्टी,पाणीपट्टी वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करावे. 
- गणेश गिते, सभापती, स्थायी समिती.  

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार