
नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून सक्तीची वसूली मोहीम सुरू आहे. यामध्ये मात्र काही थकबाकीदारांना वगळून जिल्हा बँकेने गरीब शेतकऱ्यांनाच वेठीस धरले आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या या कारवाईस विरोध दर्शविला आहे. तसेच काही कर्जदार शेतकऱ्यांचे खासगी वाहने देखील जिल्हा बँकेने जप्त करण्यात सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या कारणांमुळे शेतकऱ्यांची बाजू घेत स्वाभिमानी शेतकरी संघननेने यापूर्वी बैठक घेतली होती. त्यानुसार नूतन वर्षारंभी सोमवारी, दि. 16 जानेवारी रोजी बिऱ्हाड आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. या बिऱ्हाड आंदोलनात जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर बिऱ्हाड मोर्चा काढून आंदोलन पुकारणार आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले असून जिल्हा बँकेने सुरू केलेली वसूली थांबवावी, कर्ज माफ करू नका परंतु शेतकऱ्यांना थोड्याप्रमाणात तरी सवलत मिळण्यासाठी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन शेट्टी यांनी यावेळी केले आहे.
हेही वाचा:
- नाशिक पदवीधरसाठी नगर जिल्ह्यात सर्वांधिक मतदार नोंदणी
- गडचिरोली : भामरागडमधील तुमरकोठी येथील गावपाटलाची नक्षल्यांकडून हत्या, पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन केले कृत्य
- MPSC : एमपीएससीची बदललेली परीक्षा पद्धती दोन वर्षांनी लागू करावी : अतुल लोंढे
The post स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी : शेतकऱ्यांसाठी बिऱ्हाड मोर्चा काढून आंदोलनात सहभागी होणार appeared first on पुढारी.