हजारो गावांतील आदिवासीचे रोजगारासाठी स्थलांतर; कुटुंब आडोश्याला रस्त्याच्या कडेला

गिरणारे / गंगापूर : गेली अनेक वर्षे रोजगारासाठी स्थलांतरित होणारी आदिवासी गावे यंदा ऑक्टोबरपासूनच आपल्या कुटुंबियांसह रोजगारासाठी बाहेरगावी उपनगरांत, शहरात स्थलांतरित झाली आहे. गिरणारे, सातपूर, पेठ नाक्याच्या च्या चौफुलीवर हे आदिवासींचे जथ्थेच्या जथ्थे कुटुंबासह रस्त्याच्या कडेला आडोश्याला रोजगाराच्या प्रतीक्षेत दिसून येत आहे. दरम्यान या मजुरांसाठी कुठल्याही मूलभूत सुविधांचा अभाव आहे.एकूणच उघड्यावर ऊन,थंडीत हे आदिवासी कुटुंबासह कामाच्या प्रतीक्षेत आहे.

हजारो गावांतील आदिवासीचे रोजगारासाठी स्थलांतर 

नाशिकच्या पश्चिमपट्ट्यातील आदिवासी भागातील गावे डिसेंबर ते मे पर्यंत ओस पडतात हे चक्र गेल्या अनेक वर्षे अखंड सुरू आहे.रोजगार गैरटी कायदा, मनरेगा सह रोजगार देणाऱ्या व्यवस्था कुचकामी व कागदोपत्री कामचलाऊ झाल्याने स्थानिक रोजगाराचा अभाव असल्याने हे आदिवासी थेट घरातील भांडीकुंडी व लाकूडफाटा,अंथरून पांघरून घेऊन जीपच्या टपावर किंवा आतमध्ये कोंबून गिरणारे चौफुली,किंवा पेठ नाक्यावर रोजगारासाठी जातात,शेतीसह,बांधकाम मजुरीसाठी या आदिवाशीना येथे हक्काचा रोजगार मिळत असतो,मात्र सरकारी रोजगाराच्या केवळ वल्गना यांच्या नशिबी कायमच आहे.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

स्थलांतरित मजुरांना निवारा नाहीच

दरम्यान पावसाळ्यात आपली नागली भाताची सोंगणी करून ६ ते ८ महिने हाताला काम मिळावे म्हणून गाव सोडून हे असंख्य परिवार आपली गावे सोडतात,यात प्रामुख्याने अल्पवयीन मुलं, घरातील लहान मुलं-मुली असतात. त्यांच्या शिक्षणाच्या आरोग्याच्या दृष्टीने मजुरांच्या बाजारात अथवा स्थलांतरित मजुरांना कुठल्याही निवारा, आरोग्य, शुद्ध पाणी व संरक्षण मिळत नाही हेच वास्तव आहे.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

रोजगारासाठी वणवण ही कित्येक वर्षे आमच्या पाट्याला पुजलेली आहे, गरिबीत आयुष्य जगतांना आम्हाला कुटुंबासाठी दरवर्षी घरापासून कित्येक महिने दूर कामासाठी जावं लागतं,त्यातून घरचा खर्च भागतो,प्रसंगी कुटुंबासह जातो मुलांची शिक्षणे वाया जातात,वणवण भटकावे लागते,शेतीतून मिळणाऱ्या रोजगारातून पावसाळ्यात शेतीचे भांडवल उभे राहते,आम्हाला परगावची शेती,शेतकरी तारतो,मात्र सरकार आम्हाला कुठे ही रोजगार,सुरक्षा देत नाही याचं वाईट वाटतं.-  हिरामण रिंजड, मजूर