नाशिक : पुढारी वृत्तसेवा- विविध गुन्ह्यांत हद्दपार करण्यात आलेला रितेश भाऊसाहेब चव्हाण (२३, रा. वज्रमुद्रा अपार्टमेंट, सप्तरंग सोसायटीमागे, पेठ रोड) हा नाशिकमध्ये आला असता, विशेष पथकातील पोलिस नामदार दत्तात्रेय चकोर, गणेश वडजे यांनी त्यास अटक केली. रितेश नाशिकमध्ये येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार विशेष पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी सापळा रचून, रितेशला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला म्हसरूळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हेही वाचा :
- डाळ महागल्याने सरकारला चिंता, साठेबाजी रोखण्याचे आदेश
- नाशिक विभागात टंचाईच्या झळा, धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा
- ‘जिव्हारी’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर मराठी ओटीटीवर
The post हद्दपार रितेश चव्हाणला अटक, सापळा रचून घेतलं ताब्यात appeared first on पुढारी.