हनुमान वाट बघत असेल म्हणून मी देवळात गेलो: संजय राऊत

Sanjay Raut: सध्या राज्यात आणि देशात हनुमान यांच्यावरून राजकारण चांगलाच तापलं आहे. अशातच नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, ''मला कोणी बोलावले तर मी येतो. आज मला देवळात घेऊन गेले, हनुमान वाट बघत असेल म्हणून मी गेलो.'' नाशिकच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित, यावेळी ते असं म्हणाले आहेत.

काय म्हणाले संजय राऊत?

या कार्यक्रमात बोलताना राऊत म्हणाले आहेत की, मला कोणी बोलावले तर मी येतो. आजपर्यंत डॉक्टर बोलवत नव्हते. मला जर कोणी प्रेमाने बोलावलं तर मी नक्की येतो. आज मला हे लोक देवळात घेऊन गेले. मी गेलो. आज हनुमान जयंती आहे, देवळात जायला हवं, असं हे (कार्यकर्ते) लोक म्हणत होते. मी म्हटलं चला, हनुमान वाट बघत असले तर आपण जाऊ. शेवटी प्रत्येकाची श्रद्धा आहे, असं ते म्हणाले. डॉक्टरांवर बोलताना राऊत म्हणाले, फॅमिली डॉक्टर पिढ्यान पिढ्या असतात. डॉक्टराची ही घराणेशाही असते.

डॉक्टरांवर श्रद्धा असायला हवी

राऊत म्हणाले, आपण ज्या डॉक्टरांकडे जातो त्यावर आपली श्रद्धा हवी. जो आपल्यावर उपचार करतो. पिढ्यान पिढ्या फॅमिली डॉक्टर असतात. डॉक्टराचीही घराणेशाही असते आणि ही घराणेशाही असलीच पाहिजे.