हप्ता दिला नाही म्हणून पेपर विक्रेत्याचा जाळला स्टॉल

पेपर विक्रेत्याचा जाळला स्टॉल,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृतसेवा ; येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या चौफुलीवर असलेला पेपर स्टॉल एका तडीपार गुंडाने पेटवून दिला. हप्ता देण्यास नकार दिला तसेच फुकट पेपर दिला नाही म्हणून पेट्रोल टाकून त्याने स्टॉल पेटवून दिला. या प्रकारानंतर नाशिकरोड परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान नाशिक रोड पोलिसांनी संशयित आरोपीला दोन तासांत अटक केली आहे. पराग गायधनी असे संशयित आरोपीचे नाव आहे. (Nashik Crime)

वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे माजी अध्यक्ष किशोर सोनवणे यांचे जेलरोड येथील कोठारी कन्या शाळेजवळ पेपर विक्रीचे दुकान आहे. आज सकाळी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास किशोर सोनवणे यांचा सहकारी शरद कदम पेपर विक्रीच्या स्टॉलवर बसलेला असताना या ठिकाणी समीर गायधनी नावाचा युवक आला व त्याने पेपर फुकट दे व मला हप्ता दे अशी मागणी केली. कदम याने नकार देताच संतप्त झालेल्या गायधनी याने पेट्रोल टाकून संपूर्ण पेपर व दुकान जाळून टाकले. दरम्यान या घटनेनंतर परिसरात धावपळ उडाली व पळापळ झाली. या घटनेत पूर्ण दुकान जळून खाक झाले असून सुमारे 15 ते 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

वृत्तपत्र विक्रेते किशोर सोनवणे यांचा स्टॉल जाळल्याचे समजतात वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सुनील मगर, महेश कुलथे, विजय उदावंत, वसंत घोडे, विकास रहाडे, अनिल कुलथे, दत्ता मीराने, कुंदन शहाणे, उमेश शिंदे, बाळकृष्ण चंद्र मोरे, उल्हास कुलथे, किरण ठोसर, इब्राहिम पठाण, विजय रोकडे आधी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व  संबधितास कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली.

हेही वाचा :

The post हप्ता दिला नाही म्हणून पेपर विक्रेत्याचा जाळला स्टॉल appeared first on पुढारी.