हम किसी से कम नहीं! आदिवासी पाड्यावरील शाळकरी मुलं म्हणताहेत चक्क आठशे तेराचे पाढे! वर्षभर भरते शाळा…

नाशिक  : नाशिक जिल्ह्यातील (Nashik )एका आदिवासी पाड्यावरील (Adiwasi Pada School) शाळकरी मुलं चक्क आठशे तेराचे पाढे म्हणतात यासोबतच त्यांच्यातील कलागुण बघून चांगले चांगले थक्क होतात. सध्या कोरोनामुळे शाळा बंद करण्यात आल्याने या गावातील मुले ऑनलाईन तसेच ऑफलाईन शिक्षणापासून वंचित झाले होते, त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची भिती बघता गावकऱ्यांनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूप लावत या मुलांना गावाबाहेर स्वतंत्र शाळा सुरु करून दिली असून या मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक जिल्हा परिषदेचे शिक्षक इथे दिवस रात्र मेहनत घेतायत.

यात थक्क करणारी गोष्ट म्हणजे ही सर्व मुले आहेत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी या आदिवासी पाड्यावरील. गुजरातच्या सीमेलगतच असलेल्या आणि अवघ्या दोनशे लोकसंख्या असलेल्या या गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. आपली शाळा सुंदर असावी या हेतूने मुलांनी ही शाळा एका वेगळ्या पद्धतीने सजवलीय.

या शाळेत प्रवेश करताच सर्व भिंती वारली पेंटिंगने तसेच विविध नद्या, फळे, गावांची नावे याने रंगलव्याचं नजरेस पडतात, बालवाडीच्या वर्गांमध्ये खेळणी, शाळेत डिजिटल रूम, वाचनालय यासोबतच सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी प्रोजेक्त रूमही इथे तयार करण्यात आली असून अनेक टाकाऊ वस्तूंपासून विद्यार्थ्यानी इथे वेगवेगळ्या गोष्टी तयार करत मांडल्या आहेत.

ही शाळा सुरळीत सुरु असतांनाच अचानक महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि सरकारने गेल्या वर्षी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे गावातील ही शाळा बंद करण्यात आली मात्र यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले कारण या गावात मोबाईलला नेटवर्कच नाही तर ही मुलं ऑनलाईन शिक्षण घेणार तरी कशी ? आणि यामुळेच गावकऱ्यांनी एकमताने निर्णय घेतला..

ग्रामसेवक  शक्तीकुमार सोनवणे म्हणतात इथं ऑनलाइन शिक्षण नाही, शिक्षणात खंड पडू नये आणि गुणवत्तेवर परिणाम होऊ नये म्हणून गावाबाहेर शाळा सुरु केलीय. ज्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही तिथे शाळा सुरु करायला हरकत नाही.

एक पालक अनिता पवार सांगतात की, मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही गावकऱ्यांनी शाळा सुरु केली, 8 दिवस शाळा बंद होती तेव्हा मुले बाहेर भटकायचे त्यामुळे टेकडीवर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. तिथे मुले अभ्यास करतात, शाळा सुरु करायलाच हवी आम्ही एवढे शिकलो नाही. त्यामुळे आमच्या मुलांनी पुढे जावं असं वाटत.

गावातील जिल्हा परिषदेची शाळा बंद झाल्यानंतर गावाबाहेरच एका टेकडीवर झाडाखाली गावकऱ्यांनी शाळा तयार केली आणि इथेच मग मुलांचे शिक्षण सुरु झाले. हिवाळी सोबतच शेजारील दोन ते तिन गावांची मुले या शाळेत येतात आणि मन लावून अभ्यास करतात. विशेष म्हणजे या मुलांना घडविण्यात मोलाचा वाटा उचललाय तो जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक केशव गावित यांनी. या मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस आणि बारा तास ते मेहनत घेतायत.

शिक्षक केशव गावित सांगतात की, शिक्षण आणि सरावात सातत्याचा परिणाम, दर दोन दिवसांनी नवा पाढा म्हणतात. 365  दिवस बारा तास शाळा चालते. फीडबॅक घेतला जातो, प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष दिले जाते. सिनियर मुले जुनियर मुलांना शिकवतात. शहरापासून 75 किमीवर आमचे गाव ज्याची लोकसंख्या दोनशे आहे. दहावीच्या पुढे एकानेही शिक्षण घेतले नाही. कोनात ias दिसतो तर कोणाला ips बनवायचे आहे, विद्यार्थी जेव्हा घडतील तेव्हा आम्ही यशस्वी समजू. अचानक कोरोना आला आणि शाळा बंद केल्या, त्यानंतर ग्रामस्थ आणि शाळा प्रशासनाने ईथे शिक्षण देण्यास सुरुवात केली.

विशेष म्हणजे हिवाळी गावात गेल्या पावणेदोन वर्षात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून न आल्याने या गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना कोरोना म्हणजे काय ? हेच माहीत नाही मात्र याच कोरोनामुळे सरकारने सरसकट सर्व शाळा बंद करण्याची घोषणा केली आणि या सर्व विद्यार्थ्याची गावातील आवडती शाळा मात्र बंद झाल्याने त्यांच्यावर ही वेळ आली. महाराष्ट्रात अशी अनेक खेडे किंवा आदिवासी पाडे आहेत जिथे मोबाईलला नेटवर्क नसल्याने बिकट परिस्थिती निर्माण झालीय जी सर्वसामान्यांना दिसते मात्र सरकारला ती काही दिसत नाही हेच काय ते दुर्दैव.

ज्या गावात आजवर कोरोनाचा शिरकावच झाला नाही त्या गावातील शाळा बंद का करण्यात आल्या ? जिथे मोबाईलला नेटवर्कच नाही त्या गावातील मुले ऑनलाईन शिक्षण कसे घेणार ? शाळा बंद करतांना या विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी सरकारने का घेतली नाही ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून सरकार याकडे आता गांभीर्याने लक्ष देणार का ? हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.