हाऊज द जोश! नाशिकच्या आर्टलरी सेंटरमधून २७४ नवसैनिकांची तुकडी देशसेवेत; कठोर परिश्रमाचा थक्क करणारा प्रवास

नाशिक रोड : भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्रातून २७४ प्रशिक्षणार्थी नवसैनिकांची तुकडी गुरुवारी देशसेवेत दाखल झाली. सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना भारतीय सेनेत जाण्याचा मार्ग दाखविणाऱ्या केंद्रांची १९४८ मध्ये नाशिक रोडच्या आर्टिलरी सेंटरमध्ये स्थापना झाली. येथे तोफा चालविण्याचे (तोपची अर्थात, गनर) प्रशिक्षण दिले जाते.

२७४ नवसैनिकांची तुकडी देशसेवेत 

भारतातील हे सर्वांत मोठे प्रशिक्षण केंद्र आहे. ४२ आठवड्यांच्या प्रशिक्षण कालावधीत सरासरी पाच ते सहा हजार जवान प्रशिक्षण घेतात. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २७४ जवानांना गुरुवारी (ता.१८) समारंभात गौरविण्यात आले. आर्टिलरी सेंटरचे कमांडर ब्रिगेडियर जे. एस. गोराया यांनी जवानांच्या धैर्याचे, एकनिष्ठतेचे कौतुक केले. भारतीय लष्कराच्या गौरवशाली परंपरेचा आणि व्यावसायिकतेचा पाइक होण्याची पात्रता जवानांनी अंगी बाणावी, असे आवाहन त्यांनी केले. या तुकडीतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जवानांना करंडक देऊन गौरविण्यात आले. जवान नारायण शिंदे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरले. त्यांना गौरवपदक देऊन सन्मानित करण्यात आले. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

भारतातील सर्वांत मोठे प्रशिक्षण केंद्र
त्र्यंबकेश्वरच्या पर्वतराजीतील हे नाशिक रोडचे आर्टलरी सेंटर भारतातील सर्वांत मोठे प्रशिक्षण केंद्र आहे. ४८ आठवड्यांच्या वैज्ञानिक आणि कठोर प्रशिक्षणानंतर जवानांना भारतीय लष्करात समाविष्ट केले जाते. त्यांना दृढनिष्ठ सैनिकांसारखा आकार दिला जातो. त्यांना ‘गनर्स’ किंवा ‘तोपची’ म्हणून ओळखले जाते. आधुनिक युद्धाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी बलाढ्य गन, रॉकेट, क्षेपणास्त्र किंवा ऑपरेटिंग रडार हाताळण्याचे प्रशिक्षण या जवानांना देण्यात आले. या प्रशिक्षण कालावधीत एक आठवडे मूलभूत सैन्य प्रशिक्षणाचा (बीएमटी) समावेश होता. ज्यामध्ये प्रामुख्याने शारीरिक प्रशिक्षण, शस्त्रास्त्र प्रशिक्षण आणि नकाशावाचन आदी समाविष्ट होते.

हेही वाचा  - नाशिकमध्ये कोरोनाचा युरोपियन स्ट्रेन आढळला

देशाची सेवा करण्यासाठी हे जवान सज्ज

बीएमटी पूर्ण झाल्यावर आणि अल्प मुदतीनंतर ब्रेक घेतल्यानंतर जवानांना अ‍ॅडव्हान्स मिलिटरी ट्रेनिंग (एएमटी) देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या तुकडीने गुरुवारी उमराव मैगांनावर परेडमध्ये सहभाग घेतला. ४२ आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर देशाची सेवा करण्यासाठी हे जवान सज्ज झाले आहेत. जवांनांनी स्मार्ट मार्चिंगच्या हालचाली केल्या. ब्रिगेडियर जे. एस. गोरया यांनी परेडचा आढावा घेतला. भारतीय सैन्याच्या समृद्ध परंपरा आणि व्यावसायिकता टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी जवांना प्रेरित केले. कोरोनाचे सावट असल्याने संचलनांत सहभागी झालेला २७४ जवानांच्या तुकडीने तोंडावर मास्क लावून व परस्परांमध्ये अंतर राखले होते.