हागणदारीमुक्त सर्वेक्षणात नाशिक महापालिकेलाओडीएफ प्लस प्लस मानांकन 

हागणदारीमुक्त सर्वेक्षणात ओडीएफ प्लस प्लस मानांकन 

शहर स्वच्छता स्पर्धेत पहिली परीक्षा महापालिका उत्तीर्ण 

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर स्पर्धेत झालेल्या हागणदारीमुक्त सर्वेक्षणात महापालिकेला ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यातील ही पहिली परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आता वॉटर प्लस प्लस मानांकन मिळविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, यात वरचे मानांकन मिळाल्यास देशात पहिल्या दहामध्ये येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

हागणदारीमुक्त सर्वेक्षणात ओडीएफ प्लस प्लस मानांकन 
घराप्रमाणेच शहर स्वच्छ ठेवण्याच्या संकल्पनेला चालना मिळावी म्हणून केंद्र सरकारतर्फे पाच वर्षांपासून स्वच्छ शहर सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी शहरांमध्ये स्पर्धा निर्माण करून केंद्राच्या नागरी विकास मंत्रालयाकडून दर वर्षी क्रमांक जाहीर केले जातात. नाशिक महापालिकेची पहिल्या दहा शहरांमध्ये येण्यासाठी धडपड सुरू आहे. ऑगस्ट २०२० मध्ये जाहीर केलेल्या क्रमवारीत देशात ११, तर राज्यात नाशिक दुसऱ्या क्रमांकावर राहिले. बांधकामाचा मलबा, धूलिकणामुळे महापालिकेला पहिल्या दहा शहरांमध्ये समाविष्ट होता आले नाही. परंतु, या वर्षाच्या स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. स्वच्छ शहर सर्वेक्षणामध्ये हागणदारी मुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांची पाहणी केली जाते. डिसेंबरमध्ये केंद्र सरकारचे पथक शहरात दाखल झाले होते.

हेही वाचा > तरुणाकडून धक्कादायक वस्तू सापडताच पोलीसही हैराण! युवावर्गाला सहज मिळणाऱ्या गोष्टीचा लावणार शोध?

शहर स्वच्छता स्पर्धेत पहिली परीक्षा महापालिका उत्तीर्ण 

रात्रीच्या वेळी पथकाने पाहणी केली होती. व्यावसायिक, रहिवासी, झोपडपट्टी भागात प्रातर्विधीची काय सोय आहे, रस्त्यावर व उघड्यावर नागरिक शौचास बसतात का, सार्वजनिक शौचालये, पालिकेच्या सांडपाणी व्यवस्थापन केंद्रांची स्थिती आदीबाबत पाहणी करण्यात आली. नागरिकांशी थेट संवादातून प्रश्‍नांची उत्तरे मिळविली. या सर्व बाबतीत पथकाचे समाधान झाल्याने पालिकेला हागणदारीमुक्त सर्वेक्षणात ओडीएफ प्लस प्लस मानांकन जाहीर करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी दिली. 

हेही वाचा > एकच व्यवहार आणि जर्मनीला उच्च शिक्षण घेण्याचे तरुणाचे स्वप्न क्षणार्धात भंगले! 
जीपीएस सिस्टिमद्वारे देखरेख 
हागणदारीसंदर्भात केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकावर देखरेख ठेवण्यासाठी जीपीएस सिस्टिमची व्यवस्था करण्यात आली होती. पथक नेमक्या स्थळी पोचले कि नाही, याचा पुरावा जीपीएसद्वारे प्राप्त करण्यात आला. 

स्वच्छ शहर सर्वेक्षण स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त झाल्याने नाशिक स्वच्छतेच्या पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. आता वॉटर प्लस प्लस मानांकनासाठी तयारी करण्यात आली आहे. 
- डॉ. कल्पना कुटे, संचालक, घनकचरा व्यवस्थापन, महापालिका