हॉटेलातील दुर्गंधीने संशयकल्लोळ; दुसऱ्या मजल्यावरील भयंकर प्रकाराने खळबळ 

नाशिक रोड : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे येथील एका हॉटेलमध्ये एक असा प्रकार घडला ज्याने हॉटेल परिसरात खळबळ उडाली आहे. 

हॉटेल व परिसरात दुर्गंधी पसरल्याने खळबळ

हॉटेल मनोदय लॉकडाउनपासून बंद आहे. फक्त बिअर बारमध्ये दारू विक्रीसाठी सुरू असते. सिन्नर तालुक्यातील प्रवीण मनोहर चरडे (वय ३३) वेटर म्हणून कामाला होता. तो व्यसनी असल्याने लॉकडाउन सुरू झाल्यानंतर हॉटेलमालकाने त्याला कामावरून कमी केले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी तो दारू पिऊन काम मागण्यासाठी आला होता. मात्र, सध्या रेस्टॉरंट बंद असून, कामगार नको, असे सांगितले. प्रवीण तेथून निघून गेल्याचे भासवीत, नजर चुकवून हॉटेलच्या मागील बाजूने दुसऱ्या माळ्यावरील कामगारांच्या खोलीत जाऊन झोपला आणि मृत झाला. त्यानंतर हॉटेल व परिसरात दुर्गंधी पसरल्याने प्रवीणचा कुजलेला मृतदेह मिळून आला. पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली.  

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

आकस्मिक मृत्यूची नोंद

दुपारी हॉटेल परिसरात दुर्गंधी येत असल्याने हॉटेलमालक कामगारांच्या मदतीने दुसऱ्या मजल्यावर गेले. तेथे तपास केला असता एका तरुणाचा कुजलेला मृतदेह मिळून आला. हॉटेलमालकाने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली, सहाय्यक निरीक्षक विलास शेळके, गुन्हे शोधपथकाचे उपनिरीक्षक संदीप भालेराव, उजागरे यांनी धाव घेतली.

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार