होळीचा आनंद काही क्षणातच हिरावला! धरणावरील पर्यटन बेतले जीवावर; २ कामगारांचा दुर्दैवी अंत

वाडीवऱ्हे (जि.नाशिक) : सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास जिंदाल कंपनीतील कामगारांनी होळीचा आनंद लुटल्यानंतर सुमारे १५ कामगार मुकणे धरणावर पर्यटनासाठी गेले होते. पण हा आनंद फार काळ नाही टिकला. काय घडले वाचा....
 

१५ कामगारांच्या पर्यटनाचा आनंद क्षणात हिरावला
सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास जिंदाल कंपनीतील कामगारांनी होळीचा आनंद लुटल्यानंतर सुमारे १५ कामगार मुकणे धरणावर पर्यटनासाठी गेले होते. त्यांपैकी तीन कामगार मुकणे धरणात अंघोळीसाठी उतरले. त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांपैकी मनोजकुमार मोहनचंद जोशी (वय ५१, गौजिली, उत्तराखंड), कमलसिंग खरकसिंग बिष्ट (२५, रा. नैनिताल, उत्तराखंड) या दोघांचा बुडून मृत्यू झाला. त्यांच्यासमवेत असलेल्या कामगारांनी आरडाओरडा करून स्थानिक नागरिकांना मदतीची विनंती केली. तोपर्यंत वाडीवऱ्हे पोलिस व नरेंद्र महाराज संस्थानची रुग्णवाहिका पोचली. सर्वांच्या मदतीने रवींद्र भरत सिंग (२३) याला पाण्यातून बाहेर काढत वाचविण्यात यश आले.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

आकस्मिक मृत्यूची नोंद

या तरुणास पाण्यातून काढल्यानंतर वेळीच जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले व वेळेवर उपचार झाल्याने तो बचावल्याचे पोलिसांनी सांगितले. वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शिंदे, उपनिरीक्षक पाटील, हवालदार देवीदास फड तपास करीत आहेत.  

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

एका कामगाराला वाचविण्यात यश

मुकणे धरणावर फिरावयास गेलेल्या दोन कंपनी कामगारांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. २९) दुपारी घडली. या घटनेत एका कामगाराला वाचविण्यात पोलिस व बचावपथकास यश आले.