होळी व पौर्णिमा एकत्र आल्याने अंधश्रद्धेचा कळस! लाल कपड्यांच्या मडक्यांचा प्रकार CCTV त कैद

लासलगाव (जि.नाशिक) :  रविवारी (ता. २८) मध्यरात्री होळी व पौर्णिमा एकत्र असल्याने मेन रोडवरील कोटमगाव त्रिफुलीवर लाल कपड्याने बांधलेले मडके ठेवले. हा संपूर्ण प्रकार तेथे जवळ असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. 

 लाल कपड्यांच्या मडक्यांचा प्रकार CCTV त कैद

कोटमगाव त्रिफुली येथे रविवारी मध्यरात्री दुचाकीवरून दोन जण आले. पाठीमागे बसलेली लुंगी घातलेली व्यक्ती लाल कापड बांधलेले मडके घेऊन खाली उतरली. रस्त्यावरील कुत्र्यांना पळवून लावत व्यक्ती मडके ठेवून दुचाकीवर बसून पळून गेली. सकाळी अनेक वाहने या मडक्याला चुकवत रस्ता काढत होती. मडक्याकडे आश्चर्याने नजरा लावून पाहत मार्गस्थ होत होते. मात्र कोणीही मडके रस्त्याच्या बाजूला केले नाही. शेवटी लासलगाव पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांनी दाखल होत मडके उचलून घेऊन जाण्याच्या तयारीत असताना ‘अंनिस’चे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोचले.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

हा संपूर्ण प्रकार अंधश्रद्धा पसरवणारा

पोलिसांनी मडक्याची पाहणी केली असता त्यामध्ये काही मिरच्या आणि मीठ असल्याचे समोर आले. हा संपूर्ण प्रकार अंधश्रद्धा पसरवणारा असून, याची पोलिसांनी गंभीर दखल घेत कारवाई करणे गरजेचे असल्याची मागणी अंनिसचे कार्यकर्ते राजेंद्र कराड यांनी केली. या वेळी शिवसेनेचे प्रकाश पाटील, दीपक परदेशी उपस्थित होते. 

अज्ञात दोन व्यक्तींनी कोटमगाव त्रिफुलीवर एक लाल कापड बांधलेले मडके रस्त्याच्या मधोमध ठेवून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार तेथे असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने व्यक्तींचा शोध सुरू केला आहे. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. -राहुल वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

होळी व पौर्णिमा एकत्र असल्याने हा प्रकार

लासलगाव येथे रविवारी (ता. २८) मध्यरात्री अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळाला. होळी व पौर्णिमा एकत्र असल्याने मेन रोडवरील कोटमगाव त्रिफुलीवर लाल कपड्याने बांधलेले मडके ठेवले. हा संपूर्ण प्रकार तेथे जवळ असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.