ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

देवळा (जि.नाशिक) : कुटुंबातील दोन कर्त्या व्यक्तींच्या निधनाचे दुःख पचवत असतानाच आणखी एका कर्त्या पुरुषाचेही तेथेच निधन झाल्याने येथे हळहळ व्यक्त होत आहे.

वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा,

गुंजाळनगर येथील प्रगतिशील शेतकरी प्रभाकर दगा गुंजाळ यांना कोरोना झाल्यामुळे त्यांच्यावर नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच त्यांचे वडील दगा श्‍यामभाऊ गुंजाळ यांनाही संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर उमराणे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे त्यातच निधन झाले. कुटुंबातील दोन कर्त्या व्यक्तींच्या निधनाचे दुःख पचवत असतानाच नाशिक येथे वास्तव्यास असलेले भाऊसाहेब दगा गुंजाळ यांनाही संसर्गाने घेरल्याने त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू होते. त्यांचेही तेथेच निधन झाल्याने येथे हळहळ व्यक्त होत आहे. एकाच कुटुंबातील तीन कर्त्या व्यक्तींना कोरोनाने विळखा घालून गिळंकृत केल्याने संपूर्ण देवळा तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

कुटुंबातील बाप व दोन लेकांचा संसर्गामुळे मृत्यू

ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झपाट्याने होत असताना व प्रत्येक गावात कोरोना संसर्गामुळे मृत्यू होत असतानाही नागरिक बेफिकीर वागत आहेत. दगा श्‍यामभाऊ गुंजाळ माजी उपसरपंच सतीश गुंजाळ यांचे चुलते होत. गेल्या चार-पाच दिवसांत गुंजाळनगर (ता. देवळा) येथील एकाच कुटुंबातील बाप व दोन लेकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश