१२ वर्षांनंतर स्टीलच्या दराने गाठला पन्नास हजारांचा टप्पा; लॉकडाउननंतरच्या परिस्थितीमुळे वाढले भाव 

बिजोरसे (जि.नाशिक) : लॉकडाउननंतर कशीतरी बांधकामांना चालना मिळाली असताना लोकांना रोजगार मिळायला लागला. सर्वसाधारण लोकांना रोजगार मिळायला लागला; पण शेतकरी व सर्वसाधारण नोकरदार यांच्या घराचे स्वप्न अपूर्ण राहील असेच वाटायला लागले आहे. सर्वांचे काम एकदम सुरू झाल्याने स्टीलचे भाव २००८ नंतर प्रथमच सर्व करांसह पन्नास हजारांच्या आसपास पोचले आहेत. बांधकाम व्यवसायाने झेप घेतल्यामुळे ही दरवाढ झाल्याचे सांगितले जाते. तसेच कच्चा मालाचा तुटवडा हेही कारण सांगण्यात येते. 

 टनामागे सहा ते सात हजार रुपये वाढ

भंगारपासून ही लोखंडनिर्मिती केली जात असल्याने एकप्रकारे पर्यावरण रक्षणासाठी मदत होते, पण लॉकडाउनच्या काळात मंदी असल्याने भंगार मालही पाहिजे त्या प्रमाणात मुंबई, नाशिक, ठाणे, जालना, नागपूर या व्यावसायिकांना मिळत नाही. तसेच कच्च्या मालाचा तुटवडाही निर्माण झाल्याने मागणी जास्त व पुरवठा कमी, यामुळे हे सर्व जुळून आले. 
गेल्या आठवड्यापर्यंत ४३ हजारांचा भाव होता. अचानक स्टीलच्या भावाने ४९ हजार ते ५० हजारांचा टप्पा ओलांडला म्हणजे सहा ते सात हजार रुपये टनामागे वाढले. बांधकाम कसे करायचे, असा प्रश्न सर्वसाधारण नागरिकांना पडला आहे. दिवसेंदिवस मागणी वाढतच आहे. त्याचप्रमाणे विटाही सध्या मिळत नाही. उशिरापर्यंत पाऊस चालल्याने वीटभट्टीही उशिरा लागल्यामुळे त्याही आज पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. वाळूचा लिलाव होत नाही. या सर्व समस्यांना व्यावसायिकांना व ठेकेदारांना व सर्वसाधारण नागरिकांना याचा फटका बसत आहे. या सर्व महागाईमुळे घरांचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, या पेचात सापडला आहे. 
 

हेही वाचा >> मित्राच्या बहिणीच्या लग्नाचा तो सोहळा ठरला अखेरचा; जीवलग मित्राची कायमची ताटातूट ​
बांधकामासाठी खालीलप्रमाणे 

स्टील लागते व आजचा भाव 
सहा एमएम ४७ हजार रुपये १८ टक्के जीएसटी 
आठ एमएम ४५ हजार रुपये १८ टक्के जीएसटी 
१२ एमएम ४४ हजार ५०० रुपये १८ टक्के जीएसटी 
साधारणतः ५० हजारांच्या आसपास असे प्रतिटन भाव आजच्या घडीला आहेत. 
 

बारा वर्षांनंतर ही भाववाढ झाली आहे. याचा परिणाम बांधकाम व्यावसायिकांवर साहाजिकच होणार आहे. ज्यांनी आधीच कमी किमतीत काम घेऊन ठेवले आहे त्याला त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. 
-विजय आबा शेलार (बांधकाम ठेकेदार)  

हेही वाचा >> चार वर्षाच्या चिमुरड्या 'राई'ने जिंकलं सर्वांचं मन! तीन तास नॉनस्टॉप कळसुबाई सर ​