१४६ किलो महिलेचे वजन आणि त्यात ‘सिझेरियन’! तब्बल दोन तास शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरची कमाल

नाशिक : वजन जास्त असल्याने या महिलेला अनेक आरोग्य समस्या होत्या. उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड आणि अंगावर सूज अशा अनेक समस्यांना सांभाळून महिलेची प्रसूती करणे अतिशय जोखमीचे आणि कौशल्याचे कार्य असते. 

अनेक अडचणींना सामोरे जात शस्त्रक्रिया

सर्व प्रकारच्या आरोग्य समस्या असल्याने बाळाचीही प्रकृती नाजूक होती. बाळाचे ठोके कमी होत होते, अंगावर सूज होती आणि बाळाला रक्तप्रवाह कमी होत होता. त्यामुळे पर्यायाने बाळही अनेक अडचणींना सामोरे जात होते. परंतु बाळाला आणि आईला कोणतीही इजा न होऊ देता डॉ. प्रणिता संघवी यांनी आपला अनुभव आणि कौशल्य वापरून सुखरूप प्रसूती केली. या सर्व प्रक्रियेत रुग्णालयाचे मेडिकल डायरेक्टर डॉ. सुशील पारख (बालरोग व नवजात शिशूतज्ज्ञ) आणि इतर अनुभवी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. दोन ते तीन दिवस रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तज्ज्ञांच्या देखरेखीत ठेवल्यानंतर महिलेस सामान्य कक्षात हलविण्यात आले. सध्या आई आणि बाळाची प्रकृती स्थिर आहे. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

डॉ. प्रणिता संघवी यांनी केली तब्बल दोन तास शस्त्रक्रिया 

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये १४६ वजन असलेल्या महिलेची सिझेरियन प्रसूती करण्यात आली. प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रतज्ज्ञ डॉ. प्रणिता संघवी यांनी तब्बल दोन तास शस्त्रक्रिया करून यशस्वी प्रसुती केली. 
रुग्णालयाचे क्लस्टर हेड सचिन बोरसे यांनी सांगितले, की अशा प्रकारच्या क्लिष्ट शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयातील तज्ज्ञांबरोबरच रुग्णालयात असणाऱ्या शस्त्रक्रिया विभाग आणि अतिदक्षता विभागातील सोयी-सुविधा महत्त्वाची भूमिका निभावतात. शस्त्रक्रिया विभागात लागणाऱ्या प्रसूती टेबल आणि इतर साधने यांचा दर्जा उत्तम असणे अत्यावश्यक असते. शस्त्रक्रिया जितकी गुंतागुंतीची असते, त्यानुसार तज्ज्ञांचे तसेच कर्मचाऱ्यांचे अनुभव कौशल्य पणास लागत असते.  

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट