१५ मार्चची तारीख उलटली! लग्न सोहळ्यांना लॉन्स, मंगलकार्यालयांमध्ये परवानगीबाबत आता नवा निर्णय

नाशिक : १५ तारखे पर्यंत लग्न समारंभ पोलीस प्रशासनाची परवानगी आटोपून घ्यावेत. अशा सुचना यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या होत्या.  नियोजित लग्न सोहळे फक्त १५ तारखेपर्यंतच करता येणार होते. पण जिल्ह्यात कोरेाना रूग्णांचे प्रमाण वाढत असल्याने शासनाच्या आदेशानुसार काही निर्बंध अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

लॉन्स, मंगलकार्यलयांमध्ये परवानगी पूर्णपणे बंद
15 तारखे पर्यंत लग्न समारंभ पोलीस प्रशासनाची परवानगी आटोपून घ्यावेत. त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असेल. तसेच १५ मार्च नंतर घरगुती पद्धतीने हे कार्यक्रम होतील. अशा सुचना देण्यात आलेल्या होत्या. पण आता एप्रिल- मे मध्ये लग्न ठरवित असलेले किंवा त्या दरम्यान करणार असल्यास या विचारांवर विरजण पडले आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, जिल्हाबंदी करणे हा पर्याय आता योग्य नाही. धडधडित आपण सर्व बंद करणार नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले. लग्न सोहळ्यांना आता लॉन्स, मंगलकार्यलयांमध्ये परवानगी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यांना खासगी जागेत कमीत कमी ५० लोकांच्या उपस्थितीत सोहळा आटोपता घ्यावा लागणार आहे. 

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

५० टक्के उपस्थिती किंवा वर्क फ्रॉम होम

.जिल्ह्यात गेल्या दहा तारखेपासून कोरोना निर्बधाचे आदेश लागू करण्यात आले. त्यामध्ये आता अधिक कठोर कार्यवाही केली जाणार असून बाजारापेठेत कुठेही गर्दी होणार नाही याकडे अधिक कटाक्षाने लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. अर्थव्यवहार सुरळीत ठेवण्याबरोबरच गर्दी देखील होणार नाही याबाबतची दक्षता घेतली जाणार आहे. खासगी आस्थापनांना ५० टक्के उपस्थिती किंवा वर्क फ्रॉम होमची कार्यवाही करण्याबाबत सुचविण्यात आले आहे

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

मंगलकार्यलयांमध्ये लग्न सोहळ्यांना परवानगी नाहीच

 जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात या कालावधीतच सुरू राहतील मात्र अत्यावश्यक सेवा, जीवनाश्यक वस्तू, भाजीपाला, फळे किराणा दूध, वृत्तपत्र वितरण यांना हे आदेश लागू राहाणार नाहीत.आठवडे बाजार हे पुर्वीच्या आदेशाप्रमाणेच पुर्णपणे बंद राहाणार आहेत. नियोजित लग्न सोहळे फक्त १५ तारखेपर्यंतच करता येणार होते. आता लॉन्स, मंगलकार्यलयांमध्ये लग्न सोहळ्यांना परवानगी दिली जाणार नाही.