१ तास ७ मिनिट शीर्षासनात हिट्स ऑन हिप; पन्नाशीतील लेफ्टनंट कर्नल यांचा जागतिक विक्रम!

नाशिक रोड : योगशिक्षक आणि मॅरेथॉन रनर असलेले लेफ्टनंट कर्नल लीमीधर भुयान (वय ४८) यांनी लष्कर दिनानिमित्त एक तास सात मिनिटे आणि दहा सेकंदात शीर्षासनाच्या स्थितीत १३ हजार ७२५ हिट्स ऑन हिप बाय हिल करून जागतिक विक्रमाला गवसणी घातली. हा विक्रम गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला जाणार आहे.

भुयान यांची विश्‍वविक्रमाला गवसणी 

तोफखाना केंद्रातील ग्यानी स्टेडियममध्ये शुक्रवारी (ता.१५) सकाळी हा विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वीही त्यांनी मोठे पाच विश्‍वविक्रम केले असून, डोके जमिनीवर ठेवून (शीर्षासन) केवळ पायांची सलग हालचाल करण्याची अनोखी कामगिरीही केली आहे. भुयान मुळचे ओडिशाचे आहेत. गेल्या ३४ वर्षांच्या अथक मेहनतीनंतर या जागतिक विक्रमाला गवसणी घालणारे भुयान यांनी दुबईच्या इवॉन स्टॅनले यांचा ६१ मिनिटे शीर्षासनाचा जागतिक विक्रम मोडीत काढला. 

भारतीय सैन्य दलासाठी अभिमानाची बाब

भारतीय सैन्यदलाच्या ७२ व्या वर्धापनदिनी त्यांनी हा अनोखा जागतिक विक्रम केल्याने भारतीय सैन्य दलासाठी ही अभिमानाची बाब ठरली. तोफखाना केंद्राचे कमांडर ब्रिगेडियर जे. एस. गोराया, जिल्हा मुख्य न्या. ए. एस. वाघवसे, नाशिक रोड न्यायालयाचे न्या. प्रभाकर आवळे, न्या. आशा सरक आदींसह तोफखाना केंद्रातील अन्य अधिकारी, त्यांचे कुटुंबीय आणि सैनिक या वेळी उपस्थित होते. कॅप्टन सुमनकुमार क्षेत्री यांनी सूत्रसंचालन केले. 

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

भुयान यांचे विक्रम 

* पन्नाशीच्या जवळ वय असलेल्या भारतीय व्यक्तीने प्रथमच शीर्षासनात पायांच्या तब्बल चार हजार हालचाली केल्या 
* २० टक्के अपंगत्व असताना सलग ४५०० शीर्षासनाचे दुसरे रेकॉर्ड केले (कोका कोला रेकॉर्ड) 
* पाच हजार शीर्षासनाचे तिसरे रेकॉर्ड केले (लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड) 
* इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसचे शीर्षासनाचे ५५०० रेकॉर्ड 
* तब्बल १३ हजार ७२५ शीर्षासनाचे गीनिज वर्ल्ड रेकॉर्ड  

हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?