२९ मार्चपासून हैदराबाद-नाशिक-सुरत विमानसेवा! ‘असे’ होतील उड्डाण

नाशिक : जानेवारी महिन्यात तांत्रिक कारणांमुळे बंद पडलेली हैदराबाद-नाशिक-सुरत विमानसेवा पुन्हा २९ मार्चपासून सुरु होणार आहे. सोमवार ते शनिवार, असे सहा दिवस सेवा सुरु राहील. स्पाइस जेटच्या वतीने सेवा चालविली जाणार आहे. याच दिवशी स्पाइस जेट तर्फे नाशिक-कोलकता विमानसेवा सुरू होणार आहे. 

सहा दिवस सेवा
अलायन्स एअर कंपनीच्यावतीने अहमदाबाद, हैदराबाद, पुणे. स्पाईसजेट कंपनीच्या वतीने दिल्ली, पुणे, बेंगळूरु, ट्रुजेट कंपनीच्या वतीने अहमदाबाद तर स्टार एअरवेज कंपनीच्यावतीने बेळगाव हवाई सेवा सध्या सुरू आहे. आता नाशिकच्या हवाई सेवेचा आणखी विस्तार होत असून, जानेवारी महिन्यात बंद पडलेली हैदराबाद-नाशिक सेवा सुरु होणार आहे. सेवेचा विस्तार करताना हैदराबादहून नाशिकच्या ओझर विमानतळावर पोहोचल्यानंतर पुढे सुरतकडे उड्डाण होईल.

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

महत्त्वाचे औद्योगिक शहर जोडले जाणार

या निमित्ताने सुरत, हैदराबाद व कोलकता हे महत्त्वाचे औद्योगिक शहर जोडले जाणार आहे. स्पाइस जेट कंपनीच्या वतीने सोमवार ते शनिवार असे सहा दिवस २९ मार्च पासून सेवा सुरू होईल. त्याचबरोबर दिल्ली येथील हवाई सेवेचा विस्तार देखील होणार आहे. एक एप्रिल पासून दिल्लीसाठी आता सोमवार ते रविवार असे सात दिवस उड्डाण होईल. एक एप्रिलपासून दिल्ली हवाई सेवेचा विस्तार होईल. 

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय! 

नाशिकमधून कोलकता शहराला जोडणारी हवाई सेवा सुरू होणार असून, त्यापाठोपाठ सुरत व हैदराबाद सेवा देखील सुरू होणार आहे. दिल्ली, बेंगलुरु, अहमदाबाद, हैदराबाद पाठोपाठ आणखी एक मेट्रो शहर नाशिकशी जोडले जाणार असल्याने उद्योग, व्यवसायासाठी लाभ मिळेल. 
- मनीष रावल, चेअरमन, एव्हिएशन कमिटी, नाशिक.