३२ लाखांचा गुटखा जप्त; अन्न व औषध विभाग पथकाची कारवाई

नाशिक : उस्मानिया टॉवर येथे अवैधरीत्या प्रतिबंधक गुटख्याचा साठा असल्याची माहिती अन्न व औषध विभागास मिळाली होती. पथकाने  गुटख्याचा अवैधरीत्या साठा केलेल्या गुदामावर छापा टाकत सुमारे ३२ लाखांचा गुटखा जप्त केला.

गुदामाच्या पाहणीत अवैध साठा

भद्रकाली पोलिस ठाण्यात दस्तगीर उस्मान शेख (वय ४१, रा. उस्मानिया टॉवर, कथडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. कथडा भागातील उस्मानिया टॉवर येथे अवैधरीत्या प्रतिबंधक गुटख्याचा साठा असल्याची माहिती अन्न व औषध विभागास मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मंगळवारी (ता. २४) सायंकाळी ही कारवाई केली. संशयित दस्तगीर शेख यांची चौकशी करीत, पथकाने केलेल्या गुदामाच्या पाहणीत अवैध साठा आढळून आला.

हेही वाचा>> निशब्द! अकरा दिवसांच्या बाळाला उराशी धरून सैनिकपत्नीने फोडला हंबरडा; आक्रोश आणि हळहळ

 ३२ लाखांचा गुटखा जप्त;

प्रतिबंध असलेला विमल पान मसाला आणि व्हीआय सुगंधीत तंबाखूचा सुमारे ३१ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा साठा आढळून आला. अन्नसुरक्षा अधिकारी अमित रासकर यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिसांत संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला. जप्त केलेल्या साठ्यात २७ लाख ८६ हजार ८४० रुपयांचा विमल पानमसाला तसेच तीन लाख ९४ हजार ७६० रुपयांचा व्हीआय सुगंधीत तंबाखूचा समावेश आहे.  

हेही वाचा>> मध्यरात्रीचा थरार! पेट्रोलपंपावरून पाच लाख लांबविले; घटना cctv मध्ये कैद