Site icon

‘५० टक्के…महिला okk’ म्हणत चित्रा वाघ यांनी केला अर्ध्या तिकीट दरात एसटी बसचा प्रवास

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला सन्मान योजनेअंतर्गत सर्व महिलांना एस टी बस प्रवासात तिकीट दरात 50 टक्के सवलत शुक्रवारपासून (दि.18) लागू करण्यात आली. ही योजना लागू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (दि.१८) या योजनेचा लाभ भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी घेतला. या प्रवासादरम्यान त्यांनी ‘५० टक्के…..महिला okk’ च्या घोषणा देत अप्रत्यक्षपणे विरोधकांना टोला लगावला.

राज्याचा सन 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना एसटी बसच्या प्रवासात तिकीट दरात 50 टक्के सवलतीची घोषणा केली होती.  ही सवलत कालपासून (दि.१७) लागू करण्यात आली आहे. फडणवीस यांनी गुरुवारी (दि.9) अर्थसंकल्प मांडला होता. राज्यात सत्तेत येऊन शिंदे सरकारला जवळपास आठ महिने पूर्ण झाले. गेल्यावर्षी जूनअखेरीस सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. (Chitra Wagh)

Chitra Wagh : लालपरीची सवारी, महिला घेई भरारी…

भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिंदे-फडणवीस सरकारने महिलांसाठी केलेल्या एसटी बसच्या प्रवासात तिकीट दरात 50 टक्के सवलतीचा लाभ घेतला. त्यांनी ठक्कर एसटी डेपो ते मालेगाव दरम्यानचा प्रवास केला. या संदर्भात त्यांनी ‘लालपरीची सवारी, महिला घेई भरारी…’ असं ट्विट करत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की,”लालपरीची सवारी, महिला घेई भरारी…फक्त बोलणारे नाही, तर जे बोलले ते करून दाखवणारे महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. श्रींच्या पादूका पंढरपूरला घेऊन जाणाऱ्या या पवित्र लालपरीच्या प्रवासात माऊलींना 50% सवलत देण्याची घोषणा यंदाच्या बजेटमध्ये सन्माननीय अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी केली आणि लागलीच त्याची पूर्तता देखील झाली.

आज सकाळी नाशिकच्या ठक्कर बाजार येथून स्वतः सहकाऱ्यांसह ST ने प्रवास सुरू केला. तिकिटावरती सवलतीची रक्कम पाहून खात्रीच पटली. प्रवासात इतर स्त्रियांशी चर्चा केली. त्यांना होणारा फायदा सांगताना चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. महिलांचे आयुष्य खऱ्या अर्थाने सुकर करणाऱ्या या ‘लालपरी सशक्त नारी’ योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मातृशक्ती तर्फे मनःपूर्वक आभार.

Chitra Wagh :काय आहेत अटी आणि सूचना

सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ५०% सवलत लागू करणे बाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे.

हेही वाचा

The post '५० टक्के…महिला okk' म्हणत चित्रा वाघ यांनी केला अर्ध्या तिकीट दरात एसटी बसचा प्रवास appeared first on पुढारी.

Exit mobile version