ॲक्टिव्‍ह रुग्णसंख्येत जिल्ह्यात १०२ ने वाढ; दिवसभरात २९५ बाधित

नाशिक : जिल्ह्यात उपचार घेत असलेल्‍या कोरोनाबाधितांची संख्या किरकोळ स्‍वरूपात वाढत आहे. बुधवारी (ता.२५) दिवसभरात २९५ कोरोनाबाधित आढळून आले, तर १८९ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. चार रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत १०२ ने वाढ झाली असून, सद्यःस्‍थितीत दोन हजार ७६२ रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत. 

नाशिक शहरातील १७० बाधित

बुधवारी आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील १७०, नाशिक ग्रामीण भागातील १०९, मालेगावचे आठ, तर जिल्‍हाबाहेरील आठ रुग्‍णांचा समावेश आहे. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १३५, नाशिक ग्रामीणमधील ४५, मालेगावचे पाच, तर जिल्‍हाबाहेरील चार रुग्ण आहेत. तर चार मृतांपैकी एक नाशिक शहरातील, दोन ग्रामीण भागातील व एक रुग्ण अन्य जिल्ह्यातील आहे. ग्रामीण भागातील मृतांमध्ये देवळाली कॅम्‍प परिसर व मालेगाव तालुक्‍यातील प्रत्येकी एका ६३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर भडगाव (जि. जळगाव) येथील व सध्या नाशिकला उपचार घेत असलेल्‍या ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्‍यू झाला आहे. शहरातील मखमलाबाद रस्त्यावरील शांतीनगर येथील ५० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

९४ हजार ८४६ रुग्‍णांनी कोरोनावर मात ​

यातून जिल्ह्यात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांची संख्या ९९ हजार ३८१ झाली असून, यापैकी ९४ हजार ८४६ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. एक हजार ७७३ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. बुधवारी दिवसभरात दाखल रुग्‍णांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार २४, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ७८, मालेगाव महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात दोन, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात चार, जिल्‍हा रुग्‍णालयात चौदा रुग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत दोन हजार ५३ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित असून, यापैकी एक हजार ४४० नाशिक शहरातील, ४९० नाशिक ग्रामीणमधील, तर मालेगाव क्षेत्रातील १२३ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती.  

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ