ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत जिल्ह्यात १९४ ने घट; दोन हजार ९२० बाधितांवर उपचार सुरू

नाशिक : जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्‍णांच्‍या संख्येत वाढ झाल्‍याने दोन दिवसांपासून उपचार घेत असलेल्‍या रुग्‍णसंख्येत घट होत आहे. शुक्रवारी (ता. १८) दिवसभरात २७९ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले असताना, बरे होणाऱ्या रुग्‍णांची संख्या ४६९ इतकी होती. चौघा रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्टिव्‍ह रुग्णसंख्येत १९४ ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात दोन हजार ९२० बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

नाशिक शहरातील १८१ बाधित

शुक्रवारी आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील १८१, नाशिक ग्रामीणचे ८८, मालेगावचे दोन, तर जिल्‍हाबाहेरील आठ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील २९३, नाशिक ग्रामीणमधील १६२, मालेगाव येथील आठ, तर जिल्‍हाबाहेरील सहा रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. चार मृतांमध्ये एक नाशिक शहरातील तर, ग्रामीणमधील तीन रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. 

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

एकूण संख्या एक लाख सहा हजार ५९४ 

दरम्‍यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या एक लाख सहा हजार ५९४ झाली असून, एक लाख एक हजार ७७६ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. आतापर्यंत एक हजार ८९८ रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. दोन हजार ९२० बाधितांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात दाखल रुग्‍णांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ५८३, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३०, मालेगावला सहा, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात १३, तर जिल्‍हा रुग्‍णालयात चार रुग्‍ण दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ७६ अहवाल प्रलंबित होते. यापैकी सर्वाधिक ५६१ अहवाल नाशिक शहरातील रुग्‍णांचे असून, ३३७ अहवाल नाशिक ग्रामीणचे, तर मालेगावच्‍या १७८ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा