​घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत चोरला पाच लाखांचा ऐवज; सटाण्यातील घटना

सटाणा (जि.नाशिक) : घराला कुलूप नसून दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे शेजारच्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी वत्सलाबाई यांचा मुलगा संतोष देवरे यांना कळविले. त्यांनी घरी येऊन बघितले असता घराचे कुलूप तोडलेले होते.

दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे शेजारच्यांच्या निदर्शनास
पोलिसांच्या माहितीनुसार, फुलेनगर नववसाहतीतील श्री खंडेराव महाराज मंदिराजवळ राहत असलेल्या वत्सलाबाई देवरे कामानिमित्त नाशिक येथे गेल्या होत्या. घराला कुलूप नसून दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे शेजारच्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी वत्सलाबाई यांचा मुलगा संतोष देवरे यांना कळविले. त्यांनी घरी येऊन बघितले असता घराचे कुलूप तोडलेले होते. घरातील लाकडी कपाट तोडून सामान अस्ताव्यस्त केले होते. संतोष यांनी भाऊ हेमंत देवरे यांच्यासह आईला बोलवून घेतले. वत्सलाबाई देवरे यांना कपाटातील सोन्याचे गाठले, नथ, ओमपान, चांदीचे दणकडे, वाळे, सोनसाखळ्या असे दागिने आणि दोन लाख पन्नास हजारांची रोकड असा चार लाख ७७ हजारांचा ऐवज लंपास केल्याचे निदर्शनास आले. पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

चार लाख ७७ हजारांचा ऐवज लंपास

घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत येथील भाक्षी रोडलगतच्या फुलेनगर नववसाहतीत घरफोडी करून चोरट्यांनी सोने-चांदी व दोन लाख पन्नास हजारांची रोकड असा चार लाख ७७ हजारांचा ऐवज लंपास केला.

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट