अमित ठाकरेंनी पदाधिकार्‍यांना दूर सारत साधला थेट विद्यार्थी सेनेशी संवाद

amit thakary www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नाशिक दौर्‍यात मंगळवारी (दि. 9) मनसेच्या पदाधिकार्‍यांना दूर सारत थेट महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सुमारे साडेतीन हजार सदस्यांशी संवाद साधला. या भेटीत त्यांनी विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांचा मोबाइल क्रमांक देत संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे. यामुळे एकूणच मनसेने तरुणाईला जोडण्यासाठी महासंपर्क अभियानाचा उद्देश स्पष्ट झाला आहे.

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे चार दिवसांपासून नाशिकच्या दौर्‍यावर होते. या दौर्‍यात त्यांनी तालुकानिहाय दौरा करत तेथील महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अमित यांचे महाविद्यालयांमधून जोरदार स्वागत केले. अमित यांच्या महासंपर्क दौर्‍याचा मंगळवारी (दि. 9) शेवटचा दिवस होता. समारोपाला त्यांनी नाशिकमधील पक्षाच्या राजगड कार्यालयात महासंवाद मेळावा घेत 40 विद्यार्थ्यांचा एक गट याप्रमाणे विद्यार्थ्यांशी संवाद साधत पक्षाची ध्येयधोरणे आणि भविष्यातील वाटचाल याविषयी माहिती दिली आणि विद्यार्थ्यांकडून येणार्‍या सूचनाही जाणून घेतल्या. अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना थेट मोबाइल क्रमांक देत संवाद साधण्याचे आवाहन केले.

यावेळी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, समन्वयक सचिन भोसले, मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर व गणेश मोरे, जिल्हाध्यक्ष श्याम गोहाड, कौशल पाटील, शहराध्यक्ष संदेश जगताप, ललित वाघ, मनविसेचे विभाग अध्यक्ष अविनाश जाधव, मेघराज नवले, सिद्धेश सानप, अक्षय गवळी, सार्थक देशपांडे, गणेश शेजुळ, मयूर रावळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

The post अमित ठाकरेंनी पदाधिकार्‍यांना दूर सारत साधला थेट विद्यार्थी सेनेशी संवाद appeared first on पुढारी.