Site icon

अ‍ॅड. नितीन ठाकरे : डॉ. पवार रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना 20 रुपयांत जेवण

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आवश्यक आधुनिक साधनसामग्रीदेखील उपलब्ध असून, रुग्णासोबत येणार्‍या नागरिकांसाठी राहण्याची व जेवणाची सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या नातेवाइकांना अवघ्या 20 रुपयांमध्ये पोटभर जेवण देणार असल्याचेही मविप्रचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी सांगितले.
चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मविप्र संस्थेच्या आडगाव (नाशिक) येथील स्व. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत सर्वरोगनिदान व हृदयरोग तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

मविप्र समाज संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयातर्फे जिल्हाभरात मोफत सर्वरोगनिदान व हृदयरोगनिदान शिबिर राबविण्यात आल्याची माहिती मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी दिली. शिबिरात रुग्णांना आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर त्वरित अशा रुग्णांवर नाशिक येथील आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये मोफत उपचार केले जाणार आहे. व्यासपीठावर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, कादवाचे उपाध्यक्ष शिवाजी बस्ते, माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, चांदवड तालुक्याचे संचालक व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड आदी उपस्थित होते. मविप्रचे संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास सुनील कबाडे, रघुनाथ आहेर, अनिल काळे, मधुकर टोपे, शिवाजी सोनवणे, नवनाथ आहेर, अनिल पाटील आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा:

The post अ‍ॅड. नितीन ठाकरे : डॉ. पवार रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना 20 रुपयांत जेवण appeared first on पुढारी.

Exit mobile version