Site icon

आपण निवडून देतो, त्याचीच ही फळं ; बेताल नेत्यांविरोधात भालचंद्र नेमाडेंचा संताप

पुढारी ऑनलाईन डेस्क:

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ज्ञानपीठ पुरस्कार विजेेते भालचंद्र नेमाडे यांनी तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त केलाय. आपणच या लोकांना निवडून देतो आणि त्याचीच ही फळं आहेत, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केली. ते जळगावात माध्यमांशी बोलत होते. राज्यातील महापुरुषांविषयी बेताल वक्तव्यामुळे राजकारण गढूळ झालं आहे. हे सर्व कुठेतरी थांबणं गरजेचे आहे, या संदर्भात भालचंद्र नेमाडे यांना विचारलं असता त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

पुढे बोलताना नेमाडे म्हणाले की, आपण या लोकांना निवडून देतो. त्याची ही फळे आहेत. आपल्याला कळत नाही का कोण चांगलं आहे ते? चांगल्या लोकांनी राजकारणात पडूच नये, हे असं झालंय. सध्याच्या परिस्थितीत कुठला चांगला माणूस धजेल? खोक्यांची भाषा चालते का? हे आपल्या सारख्याला शक्य नाही.

आपल्याला उद्याची काळजी असते. काय खावं, काय नाही, अर्ध्या लोकांना अन्न मिळत नाही. 60 टक्के लोक अपुरे राहतात. त्यांना समतोल अन्न मिळत नाही. सर्व गोष्टी नीट मिळणं हे आपल्याकडे होत नाही. फार तर 10 ते 15 टक्के लोकांचं नीट चाललंय. अशा लोकांनी कुणाला निवडून द्यावं, हे तर कळलं पाहिजे. नाही तर लोकशाहीचा काय उपयोग आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा :

The post आपण निवडून देतो, त्याचीच ही फळं ; बेताल नेत्यांविरोधात भालचंद्र नेमाडेंचा संताप appeared first on पुढारी.

Exit mobile version