आमदार कुणाल पाटील : आहिराणी भाषा, खान्देश संस्कृती संवर्धानासाठी आहिराणी साहित्य संमेलन ही पर्वणीच

साहित्य संमेलन धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

जगात आपली मातृभाषा आणि संस्कृती जपण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. त्यामुळे येणार्‍या पिढ्यांपर्यंत आहिराणी भाषा आणि खान्देश संस्कृती पोहचली पाहिजे व ती जपली गेली पाहिजे, म्हणून अखिल भारतीय आहिराणी साहित्य संमेलन असल्याचे प्रतिक्रीया आ. कुणाल पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान दि. 21 व 22 जानेवारी रोजी धुळ्यात होणार्‍या आहिराणी साहित्य संमेलनात खान्देशासह महाराष्ट्र, सुरत (गुजरात), मध्यप्रदेशातील साहित्यिक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

धुळ्यात आहिराणी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरु असल्याचीही माहिती आयोजकांनी यावेळी दिली. धुळ्यात होणार्‍या सहाव्या अखिल भारतीय आहिराणी साहित्य संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर खान्देशातील साहित्यिकांची बैठक पार पडली. बैठकीत आहिराणी संमेलनाच्या पूर्वतयारीबाबत आढावा घेण्यात आला. पाचव्या अ.भा.आहिराणी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आ.कुणाल पाटील, अध्यक्ष सुभाष आहिरे, सहावे आहिराणी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष अश्‍विनी कुणाल पाटील,अध्यक्ष रमेश बोरसे, ज्येष्ठ साहित्यिक जगदिश देवपुरकर, खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.सदाशिव सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी बैठकीत बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले की, जगात मातृभाषा व संस्कृती टिकविण्यासाठी स्पर्धा आणि संशोधन सुरु आहे. येणार्‍या अनेक पिढ्यापंर्यंत आहिराणी भाषा व संस्कृती टिकावी म्हणूनच असे संमेलन घेणे गरजेचे असतात. भाषा व आपल्या मातीविषयी अस्मिता जपली पाहिजे, आहिराणी संमेलनाबरोबच आहिराणी भाषेचे संवर्धन करीत भाषा जपण्याचे काम आपण केले पाहिजे. जिथे जिथे आहिराणी भाषा व खान्देशी माणूस असेल तिथे तिथे मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही आ.पाटील यांनी दिली. बैठकीत ज्येष्ठ साहित्यिक सुभाष अहिरे, कवी जगदिश देवपुरकर, प्रभाकर शेळके आणि विद्यमान संमेलनाध्यक्ष रमेश बोरसे यांनी मार्गदर्शन केले.

साहित्यिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

धुळ्यात आहिराणी साहित्य संमेलन होणार असल्याने त्यात सहभागी होण्यासाठी साहित्यिकांचा उत्स्फर्त प्रतिसाद मिळत आहे. दि.21 व 22 जानेवारी रोजी होणार्‍या आहिराणी संमेलनात खान्देशासह महाराष्ट्र,सुरत(गुजरात),मध्यप्रदेशात असणार्‍या खान्देशातील आहिराणी व मराठी साहित्यिक सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. हे संमेलन आहिराणी भाषेबरोबरच खान्देशात बोलल्या जाणार्‍या सर्वच बोली भाषातील साहित्यिकांचे आहे. तसेच आहिराणी,मराठी व खान्देशातील विविध बोली भाषेत साहित्य लिखाण करणारे खान्देशातील साहित्यिक या संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.सदाशिव सुर्यवंशी यांनी सांगितले.

या बैठकीला पाचवे अ.भा.आहिराणी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आ.कुणाल पाटील,संमेलनाध्यक्ष सुभाष आहिरे, सहावे आहिराणी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष सौ.अश्‍विनीताई कुणाल पाटील,संमेलनाध्यक्ष रमेश बोरसे, ज्येष्ठ साहित्यिक जगदिश देवपुरकर,प्रा.सदाशिव सुर्यवंशी, रत्नाताई पाटील,श्रावण वाणी,सुभाष शिंदे,प्रभाकर शेळके,माधव ठाकरे,प्रविण पवार,सुरेश चत्रे,विशेष कार्यअधिकारी प्रकाश पाटील,चुडामण पाटील,रमेश राठोड,रंजन खरोटे,विश्राम बिरारी,शाहिर नानाभाऊ पाटील,गझलकार शरद धनगर,संजय धनगव्हाळ,गुलाब मोरे,रविंद्र पानपाटील, विद्या भाटीया, पपिता जोशी,चेतन मराठे,जगदिश चव्हाण,भैय्या पाटील,विशाल ठाकरे,के.एन.साळुंखे,चित्ते सर आदी उपस्थित होते.  प्रभाकर शेळके यांनी आभार मानले.

हेही वाचा:

The post आमदार कुणाल पाटील : आहिराणी भाषा, खान्देश संस्कृती संवर्धानासाठी आहिराणी साहित्य संमेलन ही पर्वणीच appeared first on पुढारी.