आमदार डॉ. राहुल आहेर : वडनेरभैरवच्या विकासासाठी सदैव तत्पर

चांदवड वडनेरभैरव www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
वडनेरभैरव गाव लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या द़ृष्टीने सर्वाधिक मोठे गाव आहे. येथील द्राक्षपिकांचा विदेशातही बोलबाला आहे. अशा प्रगत गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्यांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही आ. डॉ. राहुल आहेर यांनी दिली.

वडनेरभैरव येथे 12 कोटी 5 लाख रुपयांच्या निधीतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आ. डॉ. आहेर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी शनी चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प.चे माजी भाजप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे होते. व्यासपीठावर भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, शांताराम भवर, सरपंच सुनील पाचोरकर, उपसरपंच योगेश साळुंके, बाळासाहेब माळी, ज्योती माळी, बाळासाहेब वाघ, सुनील शेलार, गीता झाल्टे, संजय पाचोरकर, दिलीप धारराव, नानासाहेब सलादे, पोपटराव पाचोरकर, डॉ. सुनील आहेर, डॉ. प्रदीप परदेशी, माधवराव शिंदे, दिगंबर वाघ, वाल्मीक वानखेडे, योगेश ढोमसे, बिटू भोयटे, राजेश गांगुर्डे, कैलास गुंजाळ, संदीप काळे, दीपक उशीर, संजय शिंदे, श्रीहरी ठाकरे, दौलतराव आहेर, संपतराव पाटील, विजय पूरकर, अनिल कोठुळे, कैलास खैरे आदी उपस्थित होते. वडनेरभैरव गावाला जोडणार्‍या रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने गावकर्‍यांना प्रवास करणे अत्यंत अवघड झाले होते. तसेच नेत्रावती नदीच्या पलीकडील सलादे वस्ती, पाचोरे वस्ती, चव्हाण वस्तीकडे जाण्यासाठी पूल नसल्याने येथील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. याबाबत आ. डॉ. राहुल आहेर यांना सांगताच त्यांनी सर्व कामांसाठी 12 कोटी 5 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे उपसरपंच योगेश साळुंके यांनी सांगितले. आ. डॉ. आहेर यांच्या या सहकार्यामुळेच गेल्या 20 ते 25 वर्षांपासून प्रलंबित असलेली सर्व कामे मार्गी लागल्याचे संजय पाचोरकर, बाळासाहेब माळी, दिलीप धारराव यांनी सांगितले. डॉ. कुंभार्डे यांनी प्रत्येक गाव, वस्तीवरील घराघरात, झोपडीत स्वच्छ व निर्मळ पाणी मिळावे, यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जलजीवन मिशन योजना राबविली जात असल्याचे सांगितले. या योजनेंतर्गत तालुक्यातील 37 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे कामे सुरू आहेत. वडनेरभैरव गावासाठी जांबुटके धरणातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविली जात असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल आहेरांनी सांगितले.

प्रलंबित विकासकामे मार्गी लागणार
वडनेरभैरव ते खडकजांब, शिंदे वस्ती ते वायकेवाडी, धोंडगव्हाणवाडी ते रतनगड रस्ता, वडनेरभैरव – रेडगाव रस्ता, चव्हाण व पाचोरकर वस्ती येथे पूल बांधणे, श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या भक्त निवासासाठी राहिलेला निधी, सभामंडप, अभ्यासिका, संपूर्ण गावासाठी एक स्वतंत्र सभागृह, मुस्लीम समाजासाठी शादीखाना आदी विकासकामे फेब्रुवारी महिन्यात मार्गी लावली जातील, अशी ग्वाही आ. आहेर यांनी उपस्थितांना दिली.

हेही वाचा:

The post आमदार डॉ. राहुल आहेर : वडनेरभैरवच्या विकासासाठी सदैव तत्पर appeared first on पुढारी.