Site icon

आर.बी.इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पिंपळनेरचा निकाल ९० टक्के

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी लोणेरे संलग्नित शांताई एज्युकेशन सोसायटी संचलित आर. बी. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पिंपळनेर या महाविद्यालयाचा द्वितीय वर्ष बी फार्मसी सत्र परीक्षा 2022-23 चा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये महाविद्यालयाचा निकाल 90% लागला. लोकेश शांताराम महाले याने 8.88 सी.जी.पी.ए.गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. रोहित भाऊसाहेब गोयकर 8.85 सी.जी.पी.ए.गुण प्राप्त करून द्वितीय, महिमा भरत साबळे 8.80 सी.जी.पी.ए.गुण, सायली योगेश एखंडे 8.75 सी.जी.पी.ए,तृतीय खुशी सुनील जाधव 8. 55 सी.जी.पी.ए.मिसबा मुस्ताक कुरेशी 8.53 सी.जी.पी.ए. गुण मिळवून चतुर्थ क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सर्व विद्यार्थ्यांना प्रा.गणेश अहिरे व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे संस्थेचे अध्यक्ष दिलीप बधान,सचिव रुपेश बधान व व्यवस्थापन समितीने अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा:

The post आर.बी.इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पिंपळनेरचा निकाल ९० टक्के appeared first on पुढारी.

Exit mobile version