आसाममध्ये सैनिकास कर्तव्यावर असताना वीरमरण

सटाणा, पुढारी वृत्तसेवा : जायखेडा येथील भूमिपुत्र सारंग अशोक अहिरे (वय ३२) या सैनिकास कर्तव्यावर असताना वीरमरण आले. सारंग हे आसाममध्ये कार्यरत होते. सैन्य दलाकडून कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूबाबत निरोप देण्यात आला आहे.

सारंग हे गेल्या दहा वर्षाहून अधिक काळापासून भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. आसाम येथे कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आले. याबाबत माहिती मिळताच कुटुंबीयांचा शोक अनावर झाला. संपूर्ण तालुक्याभरातूनही याबाबत हळहळ व्यक्त होत आहे.

सारंग यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला,याबाबत मात्र अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही. याबाबत तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सैनिकास वीरमरण आल्याले सांगितले. परंतु याबाबत अद्याप शासकीय स्तरावरून अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही.
सारंग यांचे पार्थिव आसाम येथून जायखेडा येथे पोहोचल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सारंग यांच्या पश्चात आई-वडील भाऊ व पत्नी असा परिवार आहे.

.हेही वाचा 

विधानभवनासमोर शिंदे सरकारविरूद्‌ध पत्रके फेकून घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाला अटक

जिल्हा मजूर फेडरेशन निवडणूक : आमदार कोकाटे, दराडे बंधूंसह हिरे गटाला पराभवाचा धक्का

नाशिकचा मयूर बनला अणुसंशोधन शास्त्रज्ञ

The post आसाममध्ये सैनिकास कर्तव्यावर असताना वीरमरण appeared first on पुढारी.