ईद- ए-मिलादुन्नबी : वणीमध्ये सामाजिक एकोप्याचे दर्शन

ईद- ए-मिलादुन्नबी वणी www.pudhari.news

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

मोहम्मद पैगबंर जयंतीनिमित्त ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी करण्याबरोबरच कोजागीरी पौर्णिमाही साजरी करुन नागरिकांनी सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले.

मुस्लिम बांधवांचे श्रध्दास्थान मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त वणी येथील मुस्लिम बांधवांनी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले. कोजागीरी पौर्णिमा व ईद- ए-मिलादुन्नबी दोन्ही सण एकत्र आल्याने या दिवसाला अधिक महत्व आले. सणाच्या पूर्व संध्येला वणी मुस्लिम कमिटीने पायी येणा-या शेकडो भाविकांसाठी अन्नदानाचे आयोजन करण्यात आल्याने मस्जिद चौकात अन्नदानाचे वाटन करण्यात आले. मोहम्मद पैगबंर जयंतीनिमित्त वणी येथील महाराणा प्रताप चौकातील बांधवांनी मुस्लिम बांधवासाठी दुधवाटप केले. यावेळी मुस्लिम पंच कमिटीकडून ग्रामपंचायतच्या निवडणुकीत निवडुन आलेल्या लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट व उपसरपंच विलास कड यांचा सत्कार करण्यात आला. शहरात सामाजिक सलोखा जपून गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजी महाराज जयंती, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती या दिवशी मदिना मस्जिद येथे येणा-या शोभा यात्रेवर पुष्पवृष्टी केले जाते. शहरातील अनेक वर्षांपासूनची ही परंपरा असून धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक एकोप्याचे दर्शन येथे घडते. कार्यक्रमासाठी लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास कड, ग्रा.पं.सदस्य राहुल गांगुर्डे, राकेश थोरात, जगन वाघ, नामदेव गवळी, किरण गांगुर्डे, राजश्री पारख, रंजना पालवी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपुत, पोलीस उपनिरीक्षक रतन पगार, देशमुख, महेंद्र बोरा, रविकुमार सोनवणे, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब घडवजे, डाॅ मधुकर आचार्य, गणेश देशमुख, मयुर जैन, प्रशांत कड, मनोज थोरात, प्रमोद भांबेरे तसेच अनिल गांगुर्डे, प्रविण दोशी, दिगंबर पाटोळे, अमोल भालेराव, नामदेव पैठणे, किशोर बोरा यांचा देखील सत्कार करण्यात आला. वणी मुस्लिम पंच कमिटी, वणी मुस्लिम युवा फाऊंडेशनचे कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

हेही वाचा:

The post ईद- ए-मिलादुन्नबी : वणीमध्ये सामाजिक एकोप्याचे दर्शन appeared first on पुढारी.