Site icon

उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, म्हणजे…; सुहास कांदेंचे गंभीर आरोप

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

उद्धव ठाकरे यांनी काल मालेगाव येथे झालेल्या शिवगर्जना सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर चांगलाच निशाणा साधला. या सभेत उद्धव ठाकरे यांनी अनेक गंभीर आरोप केलेत. यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा म्हणजे कुठल्या कंपनीकडून किती पैसे घेतले हे कळेल, असा आरोप शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी जनतेसाठी नाही तर, श्रीधर पाटणकर यांची चौकशी होऊ नये म्हणूनच राजीनामा दिला. हे सत्य बाहेर यावं यासाठी उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा. म्हणजे कुठल्या कंपनीकडून किती पैसे घेतलेत हे समजेल असा आरोप सुहास कांदे यांनी केला आहे.

ठाकरेंची मालेगावमधील सभा फक्त टोमण्यांची सभा होती. सभेत तरुणांना कोणतेही नेतृत्व नव्हतं. शेतकऱ्यांना दिशा देणारी ही सभा नव्हती. बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मला उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभेवर द्या आल्याची टीका कांदेनी केली. सुहास कांदे यांच्या या आरोपानंतर संजय राऊत यांनी देखील आपली प्रतिक्रीया दिली आहे. मालेगावच्या कालच्या सभेने जनता कुणाची नार्को टेस्ट करणार आहे हे दाखवून दिल्याचे राऊत म्हणाले. 50 कोंटीच्या भावात हा कांदा विकला गेला असल्याची टीका राऊतांनी केली.

हेही वाचा :

The post उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, म्हणजे...; सुहास कांदेंचे गंभीर आरोप appeared first on पुढारी.

Exit mobile version