उद्योजक सोनवणे खुन प्रकारण : संशयितांची छायाचित्रे प्रसिध्द 

सोनवणे हत्याकांड प्रकरण www.pudhari.news
नाशिक (नाशिकरोड) : पुढारी वृत्तसेवा 
येथील उद्योजक शिरीष गुलाबराव सोनवणे [ 56 ] खून प्रकरणातील आरोप अदयाप पसार आहेत. नाशिकरोड पोलिसांनी संशयित आरोपीचे छायाचित्र प्रसिध्द केले आहेत. त्यांच्याविषयी कुणालाही माहीती असेल तर त्यांनी पोलिसांसोबत संपर्क साधवा, असे अवाहन करण्यात आले आहे. दि . 9 सप्टे. रोजी सायंकाळी साडेचार वाजता शिरीष सोनवणे यांचे तीन अज्ञात संशयितांनी अपहरण करुन खुन केला होता. यासंदर्भात गजानन सोनवणे यांनी फिर्याद दाखल केली होती. खून होऊन अकरा दिवस होऊनही खुनी पोलिसांच्या हातात लागत नसल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी संशयितांची छायाचित्रे जाहीर केल्यामुळे आता लवकर सोनवणे यांच्या आरोपी पर्यंत पोलिसांना पोहचता येणार आहे.

हेही वाचा:

The post उद्योजक सोनवणे खुन प्रकारण : संशयितांची छायाचित्रे प्रसिध्द  appeared first on पुढारी.