एकनाथ खडसेंची मध्यप्रदेश सीमेवरील चेकपोस्टवर धडक, अवैध वसुलीचा भांडाफोड

एकनाथ खडसे

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मध्यरात्रीच्या सुमारास थेट महाराष्ट्र – मध्यप्रदेशच्या सीमेवर असणार्‍या आरटीओ चेक पोस्टवर धडक दिली. यात प्रत्येक वाहनधारकापासून अवैध वसुली करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार त्यांना दिसून आला. त्यांनी अगदी रंगेहात ही लाखोंची वसुली उघडकीस आणली.

याप्रसंगी सर्व वाहनधारकांनी आपण अवैध पध्दतीत पैसे देत असल्याचे नमूद केले. आमदार खडसे यांनी या सर्व कारवाईचे चित्रीकरण करून आरटीओ आणि पोलीस अधिकार्‍यांना पाचारण केले. या चेक पोस्टवर दररोज लाखो रूपयांची अवैध वसुली होत असल्याचा आरोप खडसे यांनी केला असून या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण विधानपरिषदेत प्रश्‍न उपस्थित करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

अनेकदा चेकपोस्टवरुन अवैध टोल वसुली केली जात असल्याचा आरोप केला जातो. आता राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी अवैध टोलवसुलीविरोधात आवाज उठवला आहे. एकनाथ खडसे यांनी चेकपोस्टवर जाऊन पाहणी केली. आपल्या मतदारसंघातील महाराष्ट्र-मध्यप्रदेश चेकपोस्टवर त्यांनी धडक दिली. यावेळी खडसे यांच्यासोबत काही कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. टोल नाक्यावरील पोलिसांना एकनाथ खडसे यांनी जाब विचारला.

लाखो रुपयांची वसुली…

मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या आरटीओ बेरीअरवर ते थांबले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रक चालकांकडून पैसे घेत असल्याचा आरोप करण्यात आला होता. ओव्हरलोड ट्रक असेल तर 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत रक्कम पोलीस घेत असल्याच्या तक्रारी समोर आला.

चेकपोस्टवरील वजनकाटे बंद….

या चेकपोस्टवरील वजनकाटे कामच करत नसल्याचं निदर्शनास आल्याचंही खडसेंनी म्हटलंय. वरच्या वर रक्कम घेऊन अवैध पद्धतीने पैसा घेतला जात आहे, असा आरोप खडसे यांनी केला आहे. दोनशे रुपयांपासून दोन ते आठ हजार रुपयांपर्यंत पैसे ट्रक चालकांकडून घेतले जात असल्याचं दिसून येत असल्याचे खडसे म्हणाले.

हेही वाचा :

The post एकनाथ खडसेंची मध्यप्रदेश सीमेवरील चेकपोस्टवर धडक, अवैध वसुलीचा भांडाफोड appeared first on पुढारी.