कर्नाटक निवडणुकीवरुन खडसे – महाजनांमध्ये जुंपली

Karnataka Election Results

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकच्या निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन गेले होते, भाजपमध्ये गिरीश महाजन यांना संकट मोचक असं म्हटलं जातं. मात्र आमचे संकट मोचक त्या ठिकाणी जाऊनही त्यांना भाजपच्या जागा टिकवता आल्या नाहीत. त्यामुळे कर्नाटकात संकट मोचकांचा फायदा झालेला नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. (Karnataka Election Results)

भाजपवर टीका करताना आमदार खडसे म्हणाले, कर्नाटकातील निवडणुकीच्या निकालावरून असं दिसून येतं की, महाराष्ट्रात जर आजही निवडणुका झाल्या तर मात्र भाजपला या ठिकाणी महाराष्ट्रात प्रतिसाद मिळणार नाही आणि विरोधी पक्षाचेच सरकार महाराष्ट्रात येईल हे 100 टक्के खरं आहे असा विश्वासही त्यांनी एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे. (Karnataka Election Results)

खडसेंचं फारसं महत्व राहिलेलं नाही – मंत्री महाजन

खडसेंच्या टीकेवर गिरीश महाजनांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, माझ्यावर टीका करण्यापेक्षा एकनाथ खडसे यांनी आधी तुम्ही मुक्ताईनगर पुरते बघा एक मार्केट कमिटी तुम्ही जिंकली तर तुम्ही पोकलँडवरुन मिरवणूक काढता, एक मुख्यमंत्र्याच्या लेव्हलचा माणूस एक मार्केट कमिटी जिंकली आणि पोकलँडवर चढून नाचून राहिला. या सर्व राजकारणावरून असं वाटत आहे की, एकनाथ खडसे यांचे आता जिल्ह्यात फारसं महत्व राहिलेलं नाही. खडसे साहेब जिल्ह्यात तुमचं काहीच राहिलेलं नाही. तुमच्याकडून दूध संघ गेला. तुमच्याकडून बाजार समिती गेली. आमदारकीमध्ये तुमचा पराभव झाला. यामुळे उगीच आनंद साजरा करु नका. खडसे साहेब तब्येतीला मानेल तेवढेच करा, असा सल्ला गिरीश महाजन यांनी खडसेंना दिला. तसेच एक मार्केट कमिटी घेतली तर त्यांना असं वाटते की पुरा महाराष्ट्रात जिंकला. त्यामुळे एकनाथ खडसे तुम्ही तब्बेतीला मानवेल तेवढचं करा असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

अधिक वाचा :

The post कर्नाटक निवडणुकीवरुन खडसे - महाजनांमध्ये जुंपली appeared first on पुढारी.